आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव:झरीन खानचा खुलासा, म्हणाली - एका दृश्याच्या सरावावेळी किस करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका दृश्याच्या सरावावेळी किस करण्याचा प्रयत्न केला आला होता.

अभिनेत्री झरीन खान बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती कायम आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. झरीन कायम स्वतःबद्दल उघडपणे बोलते. आता एका मुलाखतीत तिने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितले आहे. तिने सांगितले, तिला एका दृश्याच्या सरावावेळी किस करण्याचा प्रयत्न केला आला होता.

झरीन म्हणाली, मी त्या लोकांचे नाव सांगू इच्छित नाही. मात्र एका दृश्याच्या शूटिंगवेळी ताे व्यक्ती मला म्हणाला, तुम्ही घाबरू नका, एकदम सहज होऊन काम करा. कारण त्या वेळी मी खूप घाबरले होते. त्यावेळी तो व्यक्ती म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का? आपण एक किसिंग सीन करणार आहोत. मी त्याला म्हणाले, असं कुठेही करारात लिहिले नाही आणि मी कोणत्याही प्रकारचे किसिंग सीन करणार नाही.

झरीनने पुढे सांगितले, ताे मला म्हणाला, आपले मैत्रीचे नाते आपण पुढे नेऊ शकतो. तुला मी अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये घेऊ शकतो. त्यात तुला मुख्य भूमिका देऊ शकतो. मात्र मी त्याला नकार दिला आणि तेथून निघून आले.

झरीनने 'वीर'द्वारे केली होती करिअरची सुरुवात
झरीनने 2010 मध्ये सलमानच्या ‘वीर’ मधून आपले करिअर सुरू केले होते. हा चित्रपट त्यावर्षीच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता. यानंतर ती 'हेट स्टोरी 3', 'हाउसफुल 2', 'अक्सर 2' आणि
'वजाह तुम हो' या चित्रपटांमध्ये झळकली. नुकताच तिचा ‘हम भी अकेले, तुम भी अकेले’ हा चित्रपट रिलीज झाला.

बातम्या आणखी आहेत...