आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाविश्वात शोककळा:महेश भट्ट यांच्या चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरचं निधन, वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी ब्रेन हॅमरेजने झाला मृत्यू

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कास्टिंग डायरेक्टर क्रिश कपूरचे मुंबईतील मीरा रोडस्थित राहत्या घरी निधन झाले.

महेश भट्ट यांच्या 'जलेबी' आणि करीना कपूर स्टारर ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचा कास्टिंग डायरेक्टर क्रिश कपूरचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेता. 31 मे रोजी क्रिशचे निधन झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

क्रिशचा कार अपघातात मृत्यू झाल्याची चर्चा होती. पण त्याचे मामा सुनील भल्ला यांनी सांगितल्यानुसार त्याचा मृत्यू ब्रेन हॅमरेजने झाला आहे. सुनील भल्ला यांनी सांगितले, 31 मे रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास क्रिशचे निधन झाले. आम्हा सर्वांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. कारण त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. दुपारच्या सुमारास क्रिश घरात अचानक कोसळला आणि त्यानंतर त्याच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागला. ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या पश्च्यात आई, पत्नी आणि सात वर्षांची मुलगी आहे. 

क्रिशच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वातून शोक व्यक्त होत आहे. क्रिशचा मित्र आणि कुस्तीपटू संग्राम सिंग याने ट्विट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या. “खूप लवकर तू आम्हाला सोडून गेलास. तुझ्या खूप काही आठवणी तू आमच्याजवळ सोडून गेला आहेस. तू जिथे कुठे असशील तिथे खूश राहा. तुझ्या आत्म्याला शांती मिळो”, असे ट्विट संग्रामने केले.

तर 'जलेबी' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीने क्रिशच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले, माझ्यासाठी ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. क्रिश या जगात नाही, यावर अद्याप माझा विश्वास बसत नाहीये. 

क्रिशने ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘जलेबी’ या चित्रपटांसाठी काम केले होते. या चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्याने कलाकारांची निवड केली होती.  याशिवाय त्याने 'शुभरात्री' या वेबसीरिजसह अन्य प्रोजेक्ट्ससाठीही काम केले होते. क्रिश कपूर महेश भट्ट आणि विशेष भट्ट यांची कंपनी 'विशेष फिल्म्स'सोबत जुळला होता. 

बातम्या आणखी आहेत...