आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Sushant Singh Rajput CBI Inquiry Update | Rhea Chakraborty Mumbai Latest News | Central Bureau Of Investigation (CBI) Investigation Day 12th Day CBI Asked 15 Questions To Rhea's Parents Regarding Sushant And Rheas Relationship

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी:सुशांत आणि रिया रिलेशनशिपमध्ये असल्याचे तुम्हाला केव्हा समजले?; रियाच्या आईवडिलांना 8 तासांच्या चौकशीत CBI ने विचारले 15 प्रश्न

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सोमवारी रियाच्या आईवडिलांची सलग आठ तास चौकशी झाली
 • मंगळवारी पुन्हा एकदा रियाच्या वडिलांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीच्या बाराव्या दिवशी म्हणजे काल रियाच्या आईवडिलांची चौकशी झाली. सीबीआयने रियाची आई संध्या चक्रवर्ती आणि वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची सोमवारी सुमारे आठ तास चौकशी केली. पहिल्यांदाच या दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तर आज म्हणजेच मंगळवारी पुन्हा एकदा इंद्रजित चक्रवर्ती यांची चौकशी केली जात आहे. ते सीबीआयच्या कार्यालयात हजर आहेत.

सीबीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी या दोघांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान सीबीआयच्या टीमने या दोघांना रिया आणि सुशांतच्या नात्याविषयी 15 प्रश्न विचारले.

 • सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती रिलेशनशिपमध्ये आहेत हे तुम्हाला कधी कळले? ते दोघे लग्न करणार होते का?
 • सुशांत आणि रिया यांच्यातील भांडणाबद्दल शोविकने तुम्हाला कधी सांगितले होते का?
 • सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये राहायचे नाही असे रियाने तुम्हाला कधी सांगितले होते का?
 • तुम्ही सुशांतला त्याच्या घरी किंवा बाहेर किती वेळा भेटला आहात?
 • रिया ही सुशांतसोबत त्याच्याच फ्लॅटमध्ये राहायची हे तुम्हाला माहित होतं का?
 • सुशांतसोबत तुम्ही दिवसातून, आठवड्यातून किंवा महिन्यातून किती वेळा बोलायचे?
 • सुशांतचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही असे तुम्हाला कधी जाणवले होते का? किंवा रियाने कधी याबद्दल तुम्हाला सांगितले होते का?
 • सुशांतच्या पैशांशी निगडीत तुमच्यात काही व्यवहार झाला होता का?
 • सुशांतच्या पैशांशी निगडीत तुमचे रियाशी कधी बोलणे झाले होते का?
 • सुशांतचे पैसे शोविक खर्च करतोय याची माहिती तुम्हाला होती का?
 • तुम्ही कधी रिया किंवा शोविकला सुशांतच्या पैशांवरून थांबवले नाही का?
 • रियाचे ड्रग्ज माफियांसोबत कनेक्शन आहे हे तुम्हाला माहित होते का?
 • तुम्ही कधी तुमच्या मुलांना ड्रग्जचे सेवन करताना पकडले होते का?
 • तुम्ही कधी सुशांतच्या कुटूंबातील सदस्यांना भेटला किंवा कधी त्यांच्याशी संवाद साधला का?
 • सुशांतला कधी तुम्ही कुठली औषध दिली होती का आणि हो तर ती औषधे कोणती होती?

रियाचे वडील स्वतः ड्रग्ज घेतात

टाईम्स नाऊ वाहिनीच्या वृत्तानुसार, रियाचा भाऊ शोविक आणि ड्रग्ज सप्लायर यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटवरून शोविकने त्याच्या वडिलांसाठी ड्रग्ज मागवल्याचे समोर आले आहे. इंद्रजित चक्रवर्ती यांना आपल्या दोन्ही मुलांच्या ड्रग्ज व्यसनाबद्दल माहित असल्याचेही या चॅटवरुन उघड झाले आहे. इतकेच नाही तर स्वतः इंद्रजित हे देखील ड्रग्ज घेत होते.

या चॅटसंदर्भात सीबीआयकडून इंद्रजित यांची चौकशी केली गेली. मंगळवारी जेव्हा सीबीआयने त्यांची चौकशी केली होती, तेव्हादेखील त्यांना यासंदर्भात विचारणा झाली होती. या चौकशी दरम्यान त्यांनी सीबीआयशी वाद घालण्यास सुरवात केल्याचे सांगण्यात येत आहे.