आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतच्या मृत्यूच्या तीन महिन्यांनंतर:सीबीआय लवकरच फायनल रिपोर्ट सादर करेल; नितेश राणे म्हणाले- दिशाच्या मृत्यूचे सत्य त्यांना ठाऊक आहे, सीबीआयसमोर करणार खुलासा

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया चक्रवर्तीच्या वकिलांना फेटाळण्यात आलेल्या जामीन याचिकेच्या निकालाची प्रत मिळाली आहे.
  • रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीची जामीन याचिका दोनदा फेटाळण्यात आली आहे.

तीन महिने उलटून गेल्यानंतरही अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू हत्या होती की आत्महत्या, हे कोडे अद्याप सुटलेले नाही. मुंबई पोलिसांनी अॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल केल्यानंतर हे प्रकरण बिहार पोलिस, ईडी, सीबीआय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोपर्यंत पोहोचले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय येत्या काही दिवसांत या प्रकरणाशी संबंधित अंतिम तपास अहवाल सादर करू शकते अशी माहिती पुढे येत आहे. ते एम्सच्या अंतिम वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत. 17 सप्टेंबर रोजी दिल्लीत एम्सच्या डॉक्टरांची अंतिम बैठक होणार आहे. या प्रकरणात सीबीआय आत्महत्येच्या कोनातून आपला तपास पुढे नेत असल्याची माहिती आहे. आतापर्यंत त्यांना खुनाचे किंवा कोणत्याही प्रकारचे षडयंत्र असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. दरम्यान, आजही काही लोकांना चौकशीसाठी सीबीआय डीआरडीओ गेस्टहाऊसमध्ये बोलावले जाऊ शकते.

दरम्यान, या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) 17 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांचा समावेश आहे. दोघे 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. दोघांच्या जामीन याचिका खालच्या कोर्टात दोनदा फेटाळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे आता जामिनासाठी उच्च न्यायालयाचा पर्याय आहे. तथापि, रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले आहेत की त्यांचे क्लायंट (रिया आणि शोविक) जामिनासाठी घाई करु इच्छित नाहीत. सोमवारी दुपारी मनशिदें यांना रिया आणि शोविकच्या फेटाळण्यात आलेल्या जामीन याचिकेच्या निकालाच्या निर्णयाची प्रत मिळाली आहे. आज किंवा उद्या ते उच्च न्यायालयात जामिसाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • नितेश राणे म्हणाले की, त्यांना दिशाच्या मृत्यूचे सत्य ठाऊक आहे

नारायण राणे यांचा मुलगा आणि भाजप नेते नितेश राणे यांनी रिपब्लिक इंडिया न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, दिशा सॅलियनच्या मृत्यूचे सत्य त्यांना ठाऊक आहे. पण दिशाचा प्रियकर रोहनने स्वतः पुढे येऊन सर्वांना सत्य सांगावे, असे ते म्हणाले आहेत. नितेश राणे म्हणाले की, रोहन राय जे पुरावे लपवत आहे ते माझ्याकडे आहेत. रोहनने सीबीआयला सत्य सांगितले नाही तर मी सत्य सांगेन. दिशासोबत राहणारा रोहन गायब का आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जेव्हा दिशा खाली पडली, तेव्हा रोहन तिथे 25 मिनिटांनी का आला? दिशाला पार्टीत बोलविण्यात आले पण तिला पार्टीत जायचे नव्हते.

  • तू मुंबईत ये, मी तुला संरक्षण देईन

नितेश राणे म्हणाले की, रोहन रायला मी सांगू इच्छितो की, तू मुंबईत ये. घाबरू नकोस मी तुला सुरक्षा देईल. एजन्सीला सर्वकाही खरं सांग. ते म्हणाले की, रोहन रायची चौकशी केल्यास सत्य सर्वांसमोर येईल. 8 जून रोजी झालेल्या पार्टीत एक नेता उपस्थित होता. त्याच दिवशी दिशाचा मृत्यू झाला. त्या पार्टीत एक बिल्डर, दोन अभिनेते, एका अभिनेत्याचा भाऊ आणि एक मोठा नेता सामील झाला होता. दिशाच्या निधनानंतर एका आठवड्यातच म्हणजे 14 जून रोजी सुशांतचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.

नितेश राणे यांच्या म्हणण्यानुसार, '8 जूननंतर सुशांत सिंह राजपूत अस्वस्थ झाला होता. 8 तारखेला असे कोणते लोक पार्टीत उपस्थित होते, ज्यांना वाचवण्यासाठी सरकारची एवढी धडपड सुरु आहे. सरकारने एकट्या रियासाठी इतके कष्ट घेतले नसते.'

  • दिशाने आत्महत्या केली नसल्याचा दावा केला

दिशा सॅलिआनची हत्या झाल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे, 'दिशाने आत्महत्या केली नाही. ही आत्महत्या असल्यास रोहन, त्याचे मित्र, शेजारी आणि वॉचमन एवढे घाबरून का आहेत?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहेत. सोबतच त्यांनी सीबीआयच्या तपासाचे कौतुक केले असून ते म्हणाले की, ते योग्य दिशेने वाटचाल करीत आहेत याचा त्यांना आनंद आहे आणि लवकरच सत्य सर्वांना कळेल.

  • लोणावळा फार्महाऊसमधून अनेक वस्तू जप्त केल्या

काही दिवसांपूर्वी झालेल्या छाप्यात एनसीबीने सुशांतच्या लोणावळा फार्महाऊसमधून अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये एक प्रिस्क्रिप्शन, औषधे, कृत्रिम हुक्का, काही संशयित अमली पदार्थांचा समावेश आहे. फार्महाऊस कर्मचार्‍यांनी बॉलिवूडमधील काही कलाकारांनी येथे झालेल्या पार्टीत हजेरी लावल्याची पुष्टी केली आहे.

फार्महाऊसमधून अनेक आर्टिफिशिअल हुक्का सापडले आहेत.
फार्महाऊसमधून अनेक आर्टिफिशिअल हुक्का सापडले आहेत.