आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • CBI Starts Investigation In Sushant Case From Recreating The Scene To Meeting The Mumbai Police Commissioner, CBI Will Do This Work Today; No One Will Be Arrested At The Moment

सुशांत प्रकरणात सीबीआयची चौकशी सुरु:सीन रिक्रिएट करण्यापासून ते मुंबई पोलिस आयुक्तांच्या भेटीपर्यंत सीबीआय आज करणार हे काम; सध्या कुणालाही अटक केली जाणार नाही

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
सीबीआयची टीम गुरुवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाली आणि सध्या एअरफोर्सच्या गेस्टहाऊसमध्ये थांबली आहे.  - Divya Marathi
सीबीआयची टीम गुरुवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाली आणि सध्या एअरफोर्सच्या गेस्टहाऊसमध्ये थांबली आहे. 
 • सीबीआयने या प्रकरणाच्या चौकशीसाठी 15 सदस्यांची एसआयटी गठीत केली आहे.
 • अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी वांद्रास्थित राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)चे विशेष तपास पथक (एसआयटी) गुरुवारी संध्याकाळी मुंबईत दाखल झाले. शुक्रवारी या पथकाने आपला तपास सुरू केला आहे.

दिल्ली सीएफएसएलच्या 12 तज्ञांसह, पोलिस अधीक्षक (एसपी) नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्वात तीन तपास अधिका-यांचे एक पथक मुंबई पोलिसांकडून कागदपत्रे गोळा करतील आणि सुशांतच्या मृत्यूची चौकशी करणा-या अधिका-यांची भेट घेतील. अधिकारी हे दिवंगत अभिनेत्याच्या वांद्रे येथील घरीही जाणार आहेत. येथेच सुशांत 14 जून रोजी मृतावस्थेत आढळला होता. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) आतापर्यंत केलेल्या तपासणीचा तपशीलही ही टीम मागेल. दरम्यान, बीएमसी अधिका-यांनी स्पष्ट केले की, सीबीआयच्या टीमला क्वारंटाइन केले जाणार नाही. तत्पूर्वी, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह गुरुवारी दुपारी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले होते.

सीबीआयचे पथक या ठिकाणी तपासासाठी जाईल

 • सीबीआयचे एक अधिकारी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या कार्यालयात येऊन मुंबईत चौकशी सुरू करणार असल्याचे पत्र त्यांना सोपवतील. मुंबई पोलिसांकडून कागदपत्रांची मागणीही ते करतील.
 • क्राइम सीनच्या रिक्रिएशनसाठी सीबीआयचे पथक सुशांतच्या वांद्रेच्या घरी पोहोचेल. तेथे बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जातील आणि शेजार्‍यांचेही जबाब घेतले जातील.
 • सीबीआयची टीम रिया चक्रवर्तीच्या मैत्रिणीच्या घरी जाईल. या मैत्रिणीच्या घरी रिया गेल्या 15 दिवसांपासून थांबली आहे.
 • सीबीआय टीम रियाच्या वडिलांच्या उलवी येथील फ्लॅटलाही भेट देऊ शकते. तेथे ते कुटुंबातील सदस्य म्हणजेच रियाचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित आणि आईचे जबाब घेतील. या सर्वांची नावे सीबीआयच्या एफआयआरमध्ये आहेत.

या क्षणी कोणालाही अटक केली जाणार नाही

दरम्यान, सीबीआय अधिका-यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना स्पष्ट केले की, सुशांत मृत्यू प्रकरणात जोपर्यंत संशयितांविरोधात ठोस पुरावा सापडत नाही, तोपर्यंत कुणालाही अटक केली जाणार नाही. दरम्यान, मुंबई पोलिसांचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांना सीबीआय आणि मुंबई पोलिसांमधील नोडल अधिकारी करण्यात आले आहे. या प्रकरणात ते सीबीआयला सर्वतोपरी मदत करतील.

सीबीआयला या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत

सीबीआयचा तपास बिहार पोलिसांच्या एफआयआरवर आधारित असेल. ज्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या एफआयआरमध्ये आयपीसीच्या कलम 341, 348, 380, 406, 420, 306 आणि 120 बी समाविष्ट आहेत. तसेच सीबीआयला या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.

 • सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या?
 • सुशांतने आत्महत्या केली असेल तर त्यामागील खरं कारण काय आहे?
 • सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंब, आणि त्याच्या घरी काम करणा-यांचा काही संबंध आहे का?
 • सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचा काही संबंध आहे का?
 • पैश्यांच्या व्यवहारावरुन झालेले मतभेद आणि इतर आर्थिक गोष्टींमुळे सुशांतचा मृत्यू झाला आहे का?
 • सुशांतच्या आजाराबद्दलचे सत्य काय आहे? तो खरोखर नैराश्येचा सामना करत होता का?
 • सुशांतच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काही माहिती लपवण्यात आली आहे का?
 • साक्षीदार म्हणून नोंदवण्यात आलेले जबाब खरे आहेत का?
 • 13 आणि 14 जून रोजी सुशांतच्या घरी नक्की काय काय घडले?

सीबीआयसमोर आहेत ही आव्हाने

 • 60 दिवसांपेक्षा अधिकचा काळ लोटल्याने या प्रकरणातील घटनास्थळावरील क्राइम सीन जवळजवळ पुसला गेला असू शकतो. सीबीआयजवळ फक्त घटनास्थळावरुन घेण्यात आलेल्या छायाचित्रांचा आधार आहे.
 • मुंबई पोलिसांचा संपूर्ण रेकॉर्ड मराठी भाषेत आहे आणि त्याचे मराठीतून इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यास बराच काळ लागू शकेल. यात 56 साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे.
 • सुशांतच्या मृत्यूचा कोणताही प्रत्यक्षदर्शी नाही, फक्त एकच माणूस आहे ज्याने मृतदेह लटकलेला पाहिला आणि त्यानेच मृतदेह खाली काढला. अशा परिस्थितीत मृतदेह कुठे लटकला होता आणि त्याचे पाय कुठे होते या गोष्टी समजून घेण्यासाठी सीबीआयला अडचणी येऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...