आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेब्समध्ये कोरोना:किश्वर मर्चेंटच्या 4 महिन्याच्या मुलाला झाला कोरोना, सोशल मीडियावर पती सुयश रायसाठी लिहिली एप्रीसिएशन पोस्ट

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांचा चार महिन्यांचा मुलगा निरवैर राय याला कोरोना झाला आहे. अलीकडेच किश्वरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आणि सांगितले की, त्यांचा मुलगा, निरवैरची आया आणि किश्वरची घरातील मदतनीस संगीता यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांचा मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. किश्वरने असेही सांगितले की या कठीण काळात तिचा पती सुयशने तिला खूप मदत केली आणि यामुळे तिने सोशल मीडियावर सुयशसाठी एक कौतुकाची पोस्ट लिहिली आणि त्याचे आभार मानले.

किश्वरने लिहिली इमोशनल पोस्ट
किश्वरने लिहिले, 'मी या माणसाला ओळखून 11 वर्षे झाली आहेत आणि तो खूप बदलला आहे.. मी त्याला मेच्योर होताना पाहिले, अधिक समजूतदार, जबाबदार आणि प्रेम करणारे. पाच दिवसांपूर्वी निरवैर नैनीला कोरोना झाला. आणि त्यानंतर जे घडले ते भयंकर होते. आमची हाऊस हेल्पर संगीता हिलाही कोरोना झाला आणि ती क्वारंटाईनमध्ये आहे. त्यानंतर आमच्यासोबत राहणाऱ्या सिड, सुयशचे पार्टनर जे आमच्यासोबत राहत आहेत त्यांनाही संसर्ग झाला...आणि मग मोठा त्रास तेव्हा झाला जेव्हा निरवैरलाही व्हायरसची लागण झाली. यामुळे स्वयंपाक करायला, स्वच्छता करायला किंवा मदत करायला आमच्याकडे कुणीच नव्हतं. यावेळी निरवैरला खूप वेदना होत होत्या. सुयश हा सर्वात चांगला जोडीदार आहे, असा कुणालाही मिळणार नाही, त्याचे खूप खूप आभार. हे वाईट दिवस आम्ही आरामात पार केले. त्याने मला प्रत्येक गोष्टीत मदत केली.'

किश्वरच्या पोस्टवर सुयशने केली कमेंट
किश्वरने ही पोस्ट शेअर करताच त्याचे चाहते आणि मित्रांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. त्यावर टिप्पणी करताना सुयशने लिहिले, "खूप रडवते यार तू...आय लव्ह यू टू बन्नी की मम्मी, आता उद्यापासून अजून हेवी ब्रेकफास्ट... तू थांब आणि हो हॅप्पी 11 इयर्स टू अस". किश्वर आणि सुयश यांनी दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 16 डिसेंबर 2016 रोजी एकमेकांशी लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर 2021 मध्ये किश्वरने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव निरवैर राय ठेवले.

बातम्या आणखी आहेत...