आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2021 मध्ये सिल्व्हर स्क्रिनवर परतणार हे सेलेब्स:शाहरुख खानपासून भाग्यश्रीपर्यंत, दीर्घ काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्यानंतर आता 2021 मध्ये हे स्टार्स दाखवणार आपली जादू

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक स्टार्स यावर्षी मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत.

2020 या वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक मोठे बदल पाहिले गेले. लॉकडाउन आणि चित्रपटगृहे बंद असल्याने अनेक बॉलिवूड स्टार्स इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करू शकले नाहीत. या नवीन वर्षात मात्र शाहरुख खान, आमिर खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सिल्व्हर स्क्रिनवर कमबॅक करू शकतात. चला जाणून घेऊया ते सेलिब्रिटी कोण आहेत -

  • आमिर खान

2018 मध्ये 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या मल्टीस्टारर चित्रपटात झळकलेला आमिर खान गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटांपासून दूर होता. शेवटच्या चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर आमिर खान 2020 मध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार होता. परंतु कोरोनामुळे ते होऊ शकले नाही. मागील वर्षी मार्चमध्ये चंदिगडमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना अचानक लॉकडाऊनची घोषणा झाली होती. त्यानंतर शूटिंग अर्ध्यावर थांबवण्यात आले होते. आता चित्रपटाचे चित्रीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे. हा चित्रपट आता यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 'लाल सिंह चड्ढा' व्यतिरिक्त आमिर 'मुगल' या चित्रपटावरही काम करत आहे.

  • भाग्यश्री

'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्री यावर्षी मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. अभिनेत्री कंगना रनोट स्टारर तामिळनाडूच्या माजी सीएम जयललिता यांच्या बायोपिकमध्ये भाग्यश्री महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण शूटिंग पूर्ण न झाल्यास तो पुढे ढकलण्यात आला होता. आता चित्रपट पूर्ण झाला असून तो यावर्षी प्रदर्शित केला जाईल.

  • शाहरुख खान

2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘झिरो’ चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफसोबत दिसलेला शाहरुख खान गेल्या 2 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. दरम्यान, शाहरुखचे प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीने 'बार्ड ऑफ ब्लड' ची निर्मिती केली पण प्रेक्षकांना त्याचा अभिनय पाहण्याची संधी मिळाली नाही. आता ब-याच दिवसानंतर अभिनेता एक दोन नव्हे तर अनेक चित्रपटांची मेजवानी घेऊन येत आहे. शाहरुखचा 'पठाण' आणि 'स्पाय युनिव्हर्स' हे चित्रपट यंदा रिलीज होणार आहे. याशिवाय तो अॅट ली आणि राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. चाहत्यांची दोन वर्षांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

  • सलमान खान

2019 साली कतरिना कैफसोबत 'भारत' चित्रपटात दिसलेला सलमान खान यावर्षी 'राधे' या चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार आहे. 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, परंतु साथीच्या आजारामुळे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. चित्रपटाला डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन सतत चांगल्या ऑफर येत होत्या, पण निर्मात्यांना तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करायचा होता. मात्र आता सलमानने हा चित्रपट झी स्टुडिओजला विकला असल्याची बातमी आहे. यासोबत सलमान 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटातही दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने आपल्या आगामी 'अंतिम' या चित्रपटातील फर्स्ट लूकदेखील रिव्हील केला असून यात तो सरदारच्या भूमिकेत दिसणार आहे. 2021 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

  • प्रियांका चोप्रा

2019 च्या 'द स्काय इज पिंक' या चित्रपटानंतर प्रियांका चोप्रा 'द व्हाइट टायगर' आणि 'क्वांटिको'च्या पुढील सीझनमध्ये दिसणार आहे. यासह प्रियांका कल्पना चावलावर आधारित बायोपिकमध्येही कल्पनाची भूमिका साकारू शकते. अद्याप याविषयी अधिकृत घोषणा झालेली नाही. तिचा 'हीरा मंडी' हा चित्रपटही 2021 मध्ये रिलीज होऊ शकतो.

  • जॉन अब्राहम

2019 मध्ये 'पागलपंती', 'बाटला हाऊस', 'सत्यमेव जयते' या चित्रपटात दिसणारा जॉन अब्राहम 2020 मध्ये एक, दोन नव्हे तर पाच चित्रपटात दिसणार होता. पण कोरोनामुळे ते शक्य होऊ शकले नाही. त्याच्या 'सत्यमेव जयते 2' चे शूटिंग सुरु असून तो 2021 मध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय जॉन 'मुंबई सागा', 'अ‍टॅक', 'सरदार अँड ग्रॅण्डसन' आणि 'पठाण'मध्ये दिसणार आहे.

  • ऐश्वर्या राय बच्चन

बॉलिवूड दिवा ऐश्वर्या राय बच्चन 2018 मध्ये 'फन्ने खान' या चित्रपटात दिसली होती. आता दोन वर्षानंतर ऐश्वर्या मणिरत्नम यांच्या ‘पोनियन सेल्वान’सह 'गुलाब जामुन' आणि 'जॅस्मिन : स्टोरी ऑफ ए लीज्ड वूमन'मध्ये दिसणार आहे.

  • सोनम कपूर

'द झोया फॅक्टर'च्या दोन वर्षानंतर सोनम कपूर पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. 2021 मध्ये सोनम 'ब्लाइंड' या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शूटिंगही सुरू झाले आहे.

  • रणबीर कपूर

2018 मध्ये संजय दत्तचा बायोपिक 'संजू'मध्ये झळकल्यानंतर रणबीर कपूर मोठ्या पडद्यापासून दूर आहे. रणबीर गेल्या दोन वर्षांपासून अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात बिझी होता. 2020 मध्ये या चित्रपटातून तो पडद्यावर परतणार होता. परंतु कोरोनामुळे ते होऊ शकले नाही. आता 2021 मध्ये रणबीर 'ब्रह्मास्त्र' शिवाय 'शमशेरा'मध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त संदीप रेड्डींच्या 'अॅनिमल' या चित्रपटामध्येही तो दिसणार आहे.

  • रणवीर सिंह

'गल्ली बॉय' या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर मागील दोन वर्षांपासून रणवीर कोणत्याही नवीन चित्रपटात दिसला नाही. 2020 मध्ये रणवीर वर्षाच्या सुरूवातीलाच 1983 च्या वर्ल्डकपवर आधारित '83' हा चित्रपट घेऊन येणार होता, पण लॉकडाऊनमुळे हा चित्रपट पुढे ढकलला गेला. आता हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय रणवीर 'जयेशभाई जोरदार', 'तख्त' आणि 'सर्कस'मध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser