आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांच्या कलेक्शनमध्ये आणखी एका लक्झरी कारची भर पडली आहे. अलीकडेच या जोडप्याने मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास ही आलिशान कार खरेदी केली आहे. कार विकत घेतल्यानंतर शिल्पा आणि राज आपल्या कुटूंबासह मुंबईत स्पॉट झाले. त्यांच्यासोबत शिल्पाची आई सुनंदा शेट्टी आणि बहीण शमिता शेट्टी देखील होत्या. शिल्पाने कारबरोबर फोटोग्राफर्सना पोजही दिली. राज आणि शिल्पा दोघेही यावेळी ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले.
कारची किंमत 71.10 लाख ते 1.46 कोटी रुपयांदरम्यान आहे
मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास ही एक महाग आणि लग्झरी कार आहे. या कारची किंमत 71.10 लाख ते 1.46 कोटी रुपयांदरम्यान आहे. या कारची आसन क्षमता 7 लोकांची असून त्याची इंजिन क्षमता 1950 cc ते 2143 ccपर्यंत आहे. ही कार 5 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बाजारात येते. या कारच्या प्रत्येक प्रकारची किंमत वेगळी आहे.
हरिद्वारमधील गंगेच्या काठी दिसली होती शिल्पा
शिल्पा आपल्या लाइफस्टाइलविषयी सोशल मीडियाच्या माध्यमांतून चाहत्यांसोबत शेअर करत असते. सेंद्रिय शेतीपासून योगापर्यंत शिल्पा सोशल मीडियावर आपल्या रोजच्या जीवनाबद्दल सर्व काही शेअर करत असते. सोमवारी (8 फेब्रुवारी) तिने हरिद्वारमधील गंगेच्या काठावर महा मृत्युंजय मंत्राचा जप करतानाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला. याला तिने अनुभव थेरपी म्हटले आहे.
शिल्पाने या पोस्टसह कॅप्शनमध्ये लिहिले, "हे तुम्हाला दीर्घायुष्य देते, पीडा दूर करते आणि अकाली मृत्यूपासून बचाव करते. हे भीती देखील दूर करते आणि आपल्याला पूर्णपणे बरे करण्याची शक्ती देते. या मंत्रामध्ये आपल्याला बरे करण्याचे सामर्थ्य आहे आणि ते मी कोठेही असले तरी मला त्यामुळे शांती मिळते." शिल्पाने आपल्या चाहत्यांना चांगले आरोग्य आणि शांततेसाठी या मंत्राचा जप करण्यास सांगितले. ती म्हणाली, 'जर तुम्हाला कोणत्याही रोगाचा त्रास होत असेल तर दररोज 11 वेळा जप करा आणि चमत्कार पहा.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.