आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Sushant Singh Rajput CBI Inquiry Update | Rhea Chakraborty Mumbai Latest News | Central Bureau Of Investigation (CBI) Investigation Day 11th Day Today Live News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीबीआय चौकशीचा 11 वा दिवस:रिया चक्रवर्तीची सलग चौथ्या दिवशी होतेय चौकशी, रियाचा भाऊ शोविकसह सिद्धार्थची होऊ शकते कॅमेऱ्यासमोर चौकशी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सुशांतची बहीण मितूची चौकशी केल्यानंतर सीबीआयची टीम त्याचे वडील आणि बहीण प्रियंकालाही चौकशीसाठी बोलावू शकते.
 • हॉटेल व्यावसायिक गौरव आर्यची ड्रग्ज प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची चौकशी करणार आहे.

अभिनेते सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचा आज 11 वा दिवस आहे. सांताक्रूझमधील डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये तिची चौकशी सुरु आहे. सीबीआयची टीम येथे मुक्कामी असून तात्पुरते येथेच ऑफिस सुरू केले आहे. रियासह तिचा भाऊ शोविकही गेस्ट हाऊसमध्ये पोहोचला. रियाची सलग चौथ्या दिवशी चौकशी केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय रिया, शोविक, सुशांतचा कुक नीरज सिंग आणि फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीची कॅमेरासमोर चौकशी करू शकते. सुशांतची बहीण मितू सिंह हिलादेखील सीबीआयने समन्स बजावले आहे. सुशांतचे वडील आणि दुसरी बहीण प्रियंका यांचेही जबाब पुढील एक-दोन दिवसांत नोंदवले जाऊ शकतात.

 • गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्यची ईडी चौकशी करीत आहे

8 जून ते 14 जून दरम्यानच्या घटनांबाबत जाणून घेण्यासाठी सीबीआयने रविवारी रियाची तब्बल नऊ तास चौकशी केली. गेल्या 3 दिवसांत रियाची जवळजवळ 26 तास चौकशी केली गेली. दरम्यान, गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरवची मुंबईतील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) टीमकडून चौकशी केली जात आहे.

 • ड्रग्जविषयी विचारलेल्या प्रश्नांवर रिया चिडली

सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी चौकशीदरम्यान तिला ड्रग्जबाबत विचारले असता सीबीआयच्या तपास अधिका-यांवर रिया चक्रवर्ती संतापली. रियाने या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले नाही. या कारणास्तव, आज पुन्हा तिला ड्रग चॅटबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. रिया चक्रवर्तीने काही प्रश्नांवर सीबीआय अधिकारी नुपूर प्रसाद यांच्याशी वाद घातल्याचे समजते. चौकशी दरम्यान महिला पोलिस कर्मचा-यांनाही पाचारण करण्यात आले होते. पैसे खर्च करण्याच्या प्रश्नावर रिया म्हणाली की, सुशांत स्वत: तिला शॉपिंग करुन देत होता. मात्र, तिने सॅम्युअल मिरांडाकडून सुशांतच्या डेबिट कार्डचा पिन का घेतला, असे विचारले असता रियाला त्याचे उत्तर देता आले नाही.

 • रिया चक्रवर्तीची कधी आणि किती वेळा चौकशी झाली
28 ऑगस्ट10 तास
29 ऑगस्ट07 तास
30 ऑगस्ट09 तास
एकूण26 तास
 • काँग्रेसचा आरोप- निर्माता संदीप सिंहचे भाजपसोबत संबंध

सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि चित्रपट निर्माता संदीप सिंह आणि भाजप यावरुन काँग्रेस आक्रमक झाली असून सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीप सिंहने भाजपच्या कुठल्या नेत्याला ब्रिफिंग केले होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी रविवारी एक पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. संदीपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवला आणि पोस्टर लाँचिंगला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याचा अर्थ त्याचे संबंध भाजपात कुणाशी जुळलेले आहेत, याचे उत्तर देशाला हवे आहे, असे सिंघवी म्हणाले. गेल्या काही महिन्यात संदीपने भाजपच्या महाराष्ट्र कार्यालयात 53 वेळा कोणाला फोन केले होते, असाही सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर मोठा आरोप केला असून सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीप सिंहने भाजपच्या एका नेत्याला भेटून याबाबत ब्रिफिंग दिले होते. हा नेता नेमका कोण आहे याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

 • सुशांत प्रकरणात भाजपचा काहीही संबंध नाही : दानवे

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी भाजपचा कोणताही संबंध नाही. केवळ लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपवर आरोप होत असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. ते म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ज्या पद्धतीने एक एक करून गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतीत आम्हाला कोणताही ठोस दावा करायचा नाही. मात्र, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी करुन सत्य लोकांसमोर आणावे. ही चौकशी होऊ नये असे कुणाला वाटत असेल तर मग संशय घ्यायला जागा आहे, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.