आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Sushant Singh Rajput CBI Inquiry Update | Rhea Chakraborty Mumbai Latest News | Central Bureau Of Investigation (CBI) Investigation Day 5th Day Today Live News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणातील सीबीआय चौकशीचा पाचवा दिवस:सिद्धार्थ पिठानीसह 6 जणांना चौकशीसाठी बोलावले, एम्सची टीम सुशांतच्या पोस्टमार्टम अहवालावर शुक्रवारी आपली प्रतिक्रिया देणार

मुंबई5 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
सीबीआयच्या पथकाने सलग चौथ्या दिवशी सिद्धार्थ पिठानीला चौकशीसाठी बोलावले. मंगळवारी सकाळी दहा वाजता सिद्धार्थ डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे पोहोचला. सीबीआयने तपासासाठी येथे आपले ऑफिस सुरू केले आहे. - Divya Marathi
सीबीआयच्या पथकाने सलग चौथ्या दिवशी सिद्धार्थ पिठानीला चौकशीसाठी बोलावले. मंगळवारी सकाळी दहा वाजता सिद्धार्थ डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे पोहोचला. सीबीआयने तपासासाठी येथे आपले ऑफिस सुरू केले आहे.
 • सीबीआयने आज सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंह, रजत मेवाती, केशव बचनेर, दीपश सावंत आणि संदीप श्रीधर यांना चौकशीसाठी समन्स बजावले.
 • रियाचे वकील सतीश मानशिंदे यांच्या म्हणण्यानुसार, अद्याप त्यांना सीबीआय चौकशीसाठी कोणतीही नोटीस मिळाली नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचा आज पाचवा दिवस आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंह, रजत मेवाती, केशव बचनेन, दीपश सावंत आणि संदीप श्रीधर यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या सर्वांची सांताक्रूझस्थित डीआरडीओ गेस्ट हाऊसवर विचारपूस केली जात आहे.

दुसरीकडे सीबीआय सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, आई संध्या आणि वडील इंद्रजित चक्रवर्ती यांचीही चौकशी करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चौघांनाही चौकशीसाठी बोलावले आहे, परंतु त्यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी हे नाकारले आहे. याशिवाय सुशांतचा बिझनेस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाची आज पुन्हा दुस-यांदा चौकशी केली जाऊ शकते.

लाइव्ह अपडेट्स

 • एम्सच्या फोरेन्सिकक टीमने सुशांतचा पोस्टमॉर्टम व व्हिसेरा रिपोर्ट तपासला आहे. शुक्रवारी ही टीम यावर आपले मत देईल.
 • मंगळवारी सकाळी 9: 20 वाजता मुंबई पोलिसांचे एक पथक डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे पोहोचले.
 • सीबीआयने सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांनाही चौकशीसाठी बोलावले. ते गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले आहेत.
 • सलग तिसर्‍या दिवशी सिद्धार्थ पिठानीची तर चौथ्या दिवशी नीरज सिंहची चौकशी होतेय. दोघेही सकाळी दहाच्या सुमारास येथे पोहोचले.

सोमवारी सीबीआयने काय केले?

सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी आणि त्याचा कूक नीरज सिंह यांची डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये सलग तिसर्‍या दिवशी चौकशी झाली. दरम्यान, दीपेश सावंत याला सीबीआयने रियासोबतच्या ब्रेकअपनंतर सुशांतची वागणूक कशी होती, याबद्दल विचारणा केली.

 • रियाने सुशांतचे इनकम आणि त्याच्या कामासंबंधित निर्णय घेतले होते का? त्याला त्याच्या कुटुंबापासून दूर ठेवले होते का? असे प्रश्न विचारले.
 • सुशांत त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्यानंतर तातडीने पोलिसांना का बोलावण्यात आले नाही, असा प्रश्नही सीबीआयने उपस्थित केला. त्यांनी पोलिसांची वाट न पाहता सुशांतचा मृतदेह खाली का काढला?
 • सोमवारी पुन्हा सीबीआयची टीम वॉटरस्टोन रिसॉर्टमध्ये पोहोचली आणि सुशांत तिथे असताना त्याचे वर्तन कसे होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सीबीआयची टीम येथे दोन तास थांबली.
 • कूपर रुग्णालयात जाऊन सुशांतचे शवविच्छेदन करणा-या डॉक्टरांची पुन्हा चौकशी केली गेली आणि सीबीआयने पोस्टमॉर्टम रिपोर्ट तपासला.
 • सुशांतचे अकाउंटंट रजत मेवाती यांचीही सीबीआयने चौकशी केली.
सोमवारी सीबीआयच्या पथकाने शांतच्या घरी काम करणारे नीरज सिंग आणि केशव बचनेर यांची सुमारे 11 तास चौकशी केली.
सोमवारी सीबीआयच्या पथकाने शांतच्या घरी काम करणारे नीरज सिंग आणि केशव बचनेर यांची सुमारे 11 तास चौकशी केली.
 • रियाला पाठवलेल्या समन्सबाबत तिच्या वकिलांनी स्पष्टीकरण दिले

रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले, "रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना अद्याप सीबीआय कडून चौकशीसाठी समन्स मिळालेले नाही. नोटिस मिळाल्यानंतर रिया आणि तिचे कुटुंबीय सीबीआयला सहकार्य करतील. यापूर्वी त्यांनी मुंबई पोलिस आणि ईडीलादेखील सहकार्य केले होते. अंदाज लावण्याची गरज नाही."

डीआरडीओ गेस्ट हाऊसच्या बाहेर जमलेली गर्दी.
डीआरडीओ गेस्ट हाऊसच्या बाहेर जमलेली गर्दी.
 • मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुशांतबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात, ग्रामविकास मंत्री हसनहसन मुश्रीफ म्हणाले, "अभिनेता गांजा सिगारेट ओढायचा हे काही रिपोर्ट्समध्ये वाचले आहेत. त्याचे अनेक मुलींशी संबंध होते. कुणी मरणोत्तर त्याला भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी केल्यास आश्चर्य वाटायला नको', असे ते म्हणाले.

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser