आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कंगना विरुद्ध राऊत:कंगना रनोटला केंद्र सरकारकडून Y+ दर्जाची सुरक्षा, अमित शाहांचे आभार व्यक्त करताना म्हणाली - 'त्यांनी भारताच्या या मुलीचा मान राखला'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनोटच्या मदतीला केंद्र सरकार धावून आले आहे. केंद्र सरकारने कंगनाला Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत.

केंद्राकडून सुरक्षा दिल्यानंतर कंगनाने देखील ट्वीट करत अमित शाह यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, ''आता कोणत्याही देशभक्ताचा आवाज दाबला जाणार नाही हे यावरुन सिद्ध होतंय. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानते. त्यांना वाटले असते तर ते मला काही दिवसांनंतर मुंबईत जाण्याचा सल्ला देऊ शकले असते. मात्र, त्यांनी भारताच्या या मुलीचा मान राखला आहे. त्यांनी माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची रक्षा केली आहे. जय हिंद'', अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे.

मुंबई आणि मुंबई पोलिसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेसह महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी कंगनावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर कंगनाला मुंबईत आल्यानंतर धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर वातावरण चांगलंच तणावपूर्ण झाले होते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा दिली आहे.

  • काय आहे प्रकरण?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?, असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता.

त्यानंतर कंगनाने आणखी एक ट्विट करत, ‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’, असे प्रत्युत्तर दिले आहे.

यावर आता संजय राऊत म्हणाले की, “धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमावते, खाते, मुंबई पोलीस त्यांचे रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.