आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन प्रमोशन:टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाने मीका सिंगला म्हटले 'क्वारंटाईन लव्ह', छायाचित्र व्हायरल झाल्यावर दिले स्पष्टीकरण 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मीकाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक छायाचित्र शेअर केले ज्यामध्ये तो चाहतच्या हाताचे चुंबन घेताना दिसतोय.

टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना आणि गायक मीका सिंह यांच्या अलीकडच्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांना उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी चाहतने मीकासोबतचे एक छायाचित्र पोस्ट करुन त्याच्या कॅप्शनमध्ये 'क्वारंटाईन लव' असे लिहिले होते. तेव्हापासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येण्यास सुरूवात झाली होती, पण आता चाहतने याविषयीचे स्पष्टीकरण दिले आहे. 

Twinning with 🖤 @mikasingh #quarantinelove #love #chahattkhanna

A post shared by CK (@chahattkhanna) on Apr 10, 2020 at 8:33am PDT

'क्वारेंटाइन लव' हे गाणे आहेः चाहत म्हणाली, 'मी आणि मीकाने 'क्वारेंटाइन लव' नावाचे एक गाणे शूट केले आहे, जे लवकरच रिलीज होईल. आम्ही हे मीकाच्या घरात शूट केले आहे, आम्ही शेजारी आहोत, म्हणून मी त्याच्या घरी शूटिंगसाठी गेले होते. आम्ही दोघांनी मिळून हे गाणे फोनवर शूट केले. लोकांना माहित नव्हते की, मी गाण्याचे प्रमोशन करतेय. त्यांना वाटले की, आम्ही डेटिंग करीत आहोत. गाण्याचे प्रमोशन करण्याचा आमचा प्लान काहीसा असा होता, जेणेकरुन प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होईल.

चाहत्यांनी दिली चेतावणी : चाहतने मुलाखतीत सांगितले की, 'बर्‍याच लोकांना याचा राग आला आणि त्यांनी मला सोशल मीडियावर अनफॉलो करायला सुरुवात केली, कारण त्यांना असे वाटले की मी मीकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मला माहित नाही लोकांना का त्रास होतोय. मीका एक चांगली व्यक्ती आहे. मी फोटो पोस्ट केल्यावर लोकांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली होती. लोक म्हणाले, 'त्याला डेट करु नको', 'तू आमचे  मन मोडले', अशा प्रतिक्रिया मला येऊ लागल्या. 

मीकानेही शेअर केले छायाचित्र : चाहत नंतर मीकाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक छायाचित्र शेअर केले ज्यामध्ये तो चाहतच्या हाताचे चुंबन घेताना दिसतोय. त्याचवेळी व्हिडिओमध्ये चाहतने त्याच्यासाठी पाणी पुरी बनवल्याचेही दिसले. 

बातम्या आणखी आहेत...