आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुड न्यूज:‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन, पोस्ट शेअर करत म्हणाला - मी नव्या पात्रात प्रवेश केला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंकूर आणि त्याच्या पत्नीला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’मधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अंकूर वाढवे नुकताच बाबा झाला आहे. त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. 14 जानेवारी रोजी अंकूर आणि त्याची पत्नी निकिता यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे.

सोशल मीडियावर आपल्या लेकीसोबतचा एक फोटो अंकुरने शेअर केला आहे. 'कालच्या दिवशी मी नवीन पात्रात प्रवेश केला आता एका मुलीचा बाप झालो,' अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.

अंकुरने 'गाढवाचं लग्न', 'सर्किट हाऊस', 'आम्ही सारे फर्स्टक्लास', 'सायलेन्स' आणि 'कन्हैया' या नाटकांसह 'जलसा' चित्रपटातही काम केलं आहे. शिवाय तो उत्तम कवी देखील आहे. त्याचा 'पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी' हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. 28 जून 2019 रोजी निकितासोबत अंकुर विवाहबद्ध झाला होता.

बातम्या आणखी आहेत...