आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बातचीत:चंदन रॉय सान्याल म्हणाले- ऋषी आणि इरफान दोघेही माझ्यावर खूप विश्वास ठेवायचे, 'कमिने'साठी आजही लोक कौतुक करतात 

मुंबई. उमेश कुमार उपाध्याय3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोघांनीही माझ्यावर खूप विश्वास ठेवला होते. ते खूप प्रेरणा देत असे.

'जज्बा', 'मंटो', 'रंग दे बसंती', 'कमिने', 'फालतू', 'डी-डे', 'जब हॅरी मेट सेजल', 'जबरीया जोडी' या चित्रपटात छोटे-छोटे पात्रे साकारणारे अभिनेते चंदन रॉय सान्याल लवकरच 'काली -2' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. यापूर्वी त्यांची 'ढीठ पतंगे' ही वेब सीरिज रिलीज झाली आहे.

दैनिक भास्करशी खास बातचीतमध्ये  ते म्हणाले की, येणारा काळ ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी चांगला आहे. वेबसीरीजविषयी बोलताना चंदन म्हणाले, 'हो, या लॉक डाऊनमध्ये चित्रपटगृहे  बंद झाली आहेत. ती लवकरच उघडण्याची आशा करुयात.'

सध्याच्या परिस्थितीत, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील दर्शकसंख्या वाढली आहे आणि ऑनलाइन प्रसिद्ध होणार्‍या वेब सीरिजला त्याचा फायदा होत आहे. ऑनलाईन सब्स्क्राइबर दुप्पट झाल्याने हा फायदा 'काली 2' लाही मिळणार आहे. मला असे वाटते की, जवळजवळ एक वर्ष हेच  चित्र राहणार आहे. सर्व प्रेक्षकांना करमणुकीचे हे साधन पसंत पडले आहे.

  • 'ढीठ पतंग'ला कसा प्रतिसाद मिळतोय?

चंदन- 'त्याची कथा आणि सह-कलाकारांच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी त्यात एक पत्रकाराची भूमिका साकारली आहे. त्याला मिळालेला प्रतिसाद अपेक्षित नव्हता. बर्‍याच स्टार्स मित्राने म्हटले की,  तू ज्या प्रकारे पात्रात शिरतोस, ते नक्कीच कौतुकास्पद आहे. असे दिसते आहे की प्रत्येक पात्रात तू जगतो. ते ऐकून छान वाटले. '

  • लॉकडाऊनमध्ये कोणते काम करायला आवडत नाही?

चंदन- 'मी नवीन घर घेतले आहे. या घरात शिफ्ट होऊन मला दीड वर्षे झाली आहेत. व्यस्ततेमुळे मी घरी जास्त राहू शकलो नाही. मी पहिल्यांदाच इतका वेळ घरी घालवत आहे, छान वाटते. तसे, मला साफसफाई करणे, भांडी धुणे, झाडू मारणे आणि स्वयंपाक करणे ही सर्व काम आवडतात, परंतु जे मला आवडत नाही ते म्हणजे कपाट साफ करणे आणि बेडशीट बदलणे. कपाट साफ करताना मला नेहमीच वाटत आहे की, माझे एखादे शर्ट हरवले आहे. बेडशीट बदलताना असे दिसते की एका बाजूला कमी पडत आहे तर दुसरीकडे जास्त आहे, हे मला अजिबात आवडत नाही.

  • 'जबरीया जोडी'च्या सेटवर तुम्ही आणि सिद्धार्थ मल्होत्रा भोजपुरीत बोलत असतं. हे खरे आहे का?

चंदन- 'हे खरं आहे. हा चित्रपटास तयार होण्यासाठी कित्येक महिने लागले. याकाळात आम्ही दोघेही चांगले मित्र बनलो. मग एकमेकांना आम्ही बाबू-बाबू म्हणू लागलो.  तालीमपासून डिनर टेबलपर्यंत आम्ही भोजपुरीमध्ये चर्चा करायचो. आम्ही दोघेही खूप आनंदी होतो. पण काही लोक आम्ही बोलत असताना आमच्याकडे टक लावून पाहत असत.'

  • परिणीती चोप्रासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

चंदन- 'माझे तिच्याबरोबर फारसे सीन नव्हते. तरीही, जेवढा वेळ आम्ही एकत्र घालवला, त्यात मी तिला हसवायचो.  ती म्हणायची की तू दूर राहा, काय-काय बोलतोय, मला हसू आवरत नाहीये.तिच्याबरोबर खूप मजामस्ती केली.'

  • गाजेलला चित्रपट 'कामिने' बद्दल काही खास गोष्ट आहे?

'त्यावेळी सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरीच वर्षे झाली आणि आजही त्यासाठी मला मेसेजेस येतात. मला अजूनही आठवतंय दिग्दर्शक विशाल भारद्वाजजी पहिल्यांदा भेटले आणि त्यांनी मला पात्र समजावून सांगितले. मग कॅमेरासमोर मी पूर्ण समर्पणानं ती भूमिका साकारली. विशालजी जसे म्हणाले तसे मी डोळे बंद करुन करत गेलो. या सेटवर शाहिद कपूरसोबत मैत्री झाली आणि आजही त्याच्याशी बोलणे होते.

  • पुढे कोणते प्रकल्प आहेत?

चंदन- प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम’ वेब सीरिजशिवाय मी दोन बंगाली चित्रपट करत आहे. या व्यतिरिक्त, इतर प्रोजेक्टदेखील आहेत, परंतु अद्याप त्याबद्दल बोलू शकत नाहीत.

  • तुम्ही इरफान आणि ऋषी यांच्यासोबत 'डी-डे' चित्रपटात काम केले होते, त्यांच्या आठवणी आहेत का?

चंदन- 'दोघांनीही माझ्यावर खूप विश्वास ठेवला होते. ते खूप प्रेरणा देत असे. 'डीडे' केल्यावर एकदा जावेद जाफरीच्या घरी पार्टी होती, तिथे माझी इरफान खानसोबत भेट झाली. तिथे त्यांनी सर्वांसमोर माझ्या अभिनयाचे कौतुक केले होते. दोघांचेही जाणे मन हेलावून टाकणारे आहे. 

बातम्या आणखी आहेत...