आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुक्रवारी एनसीबीने बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कोर्टात 12,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. कोर्टाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, एनसीबीने 33 जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे सर्वजण सुशांतला ड्रग्ज पुरवणे, त्याची खरेदी करणे तसेच बेकायदेशीर फायनान्सशी संबंधित आहेत.
या 33 जणांमध्ये रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, ड्रग्ज पेडलर्स करमजित, आजम, अनुज केसवानी, डुऐन फर्नांडिस आणि अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या नावाचा समावेश आहे. अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाजवळून चरस जप्त झाले होते. त्याचाही उल्लेख आरोपपत्रात आहे. रिया आणि शोविक यांच्यावर एनडीपीएस कायद्याच्या कलम 27A आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. याचा अर्थ असा की, त्यांच्यावर ड्रग्ज खरेदी करणे, बेकायदेशीर वित्तपुरवठा करणे आणि तस्करी करणे असे आरोप आहेत.
अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव शुक्रवारी कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात नाही. कारण दीपिकाचे नाव एनसीबीच्या 15 क्रमांकाच्या प्रकरणाशी संबंधित आहे. शुक्रवारी दाखल केलेले आरोपपत्र एनसीबीच्या प्रकरण क्रमांक 32 चे आहे. भारती सिंग, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावे आरोपपत्रात आहेत.
सुशांतच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणांचा कोणताही संबंध नाही
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी या आरोपपत्राचा काहीही संबंध नसल्याचे सूत्रांनी सांगितले. हे प्रकरण ड्रग्ज सिंडिकेटच्या तपासणीबाबतचे आहे. देश-विदेशात पसरलेले हे सिंडिकेट्स अवैध ड्रग्ज खरेदी, विक्रीशी संबंधित आहे. करमजित, आजम, अनुज केसवानी, अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडकडे मिळून एकुण 35 लाख रोख, मर्सिडीज कार, 7 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले होते. रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, क्षितीज प्रसाद आणि अंकुश अरनेजा यांचा संबंध ड्रग्जची खरेदी आणि बेकायदेशीर वित्तपुरवठ्याशी असल्याचेही समोर आले आहे.
5 फरार लोकांमध्ये अभिनेत्री सपना पब्बी आणि 4 ड्रग्ज पेडलर्सचा समावेश
या प्रकरणात फरार असलेल्या 5 लोकांमध्ये चित्रपट अभिनेत्री सपना पब्बी आणि काही ड्रग्ज पेडलर्सचा समावेश आहे. तांत्रिकदृष्ट्या, या लोकांना फरार म्हटले जाणार नाही, परंतु त्यांनी तपासात सहकार्य केलेले नाही.
सध्या तपास बंद नाही, सप्लीमेंट्री चार्जशीटदेखील दाखल केली जाईल
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ड्रग्ज प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु, एनसीबीशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, तपास पूर्ण होणे बाकी आहे. खटला सध्या सुरु आहे. यामध्ये आणखी काही बाबींचा तपास केला जाईल. नंतर सप्लीमेंट्री चार्जशीटदेखील दाखल केली जाईल. बॉलिवूडमधील आणखी काही सेलिब्रिटी चौकशीच्या विळख्यात सापडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जातेय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.