आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव सेनवर कायदेशीर कारवाई करणार करण मेहरा:म्हणाला- चारूला एका कार्यक्रमातच भेटलो, मी कुणालाही माझी इमेज खराब करू देणार नाही

किरण जैनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा यांचे नाते घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. चारूने आता राजीवला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे आणि ती तिच्या निर्णयापासून मागे हटणार नाही. दिव्य मराठीसोबतच्या खास बातचीतमध्ये चारूने राजीवबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचबरोबर राजीवच्या आरोपानंतर मी करण मेहरा यांची माफीही मागितली असल्याचेही तिने सांगितले आहे. अलीकडेच राजीवने चारू आणि करण मेहरा यांचे अफेअर होते, असा आरोप केला होता. याबाबत आम्ही करणशी बोललो तेव्हा त्याने राजीववर लवकरच कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

राजीवविरोधात कायदेशीर कारवाई करणार - करण मेहरा

या मुद्द्यावर दिव्य मराठीने करण मेहराशीही संवाद साधला आहे. संभाषणादरम्यान करणने सांगितले की, त्याने राजीव विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल बोलताना करण म्हणाला, 'कोणीही येईल आणि काहीही बोलेल... त्यांना काय वाटते की मी गप्प बसेन? असे अजिबात नाही. राजीव कोण आहे, तो काय करतो हेही मला माहीत नाही आणि तो माझ्यावर त्याच्या पत्नीसोबत अफेअर असल्याचा आरोप करत आहे. मी राजीववर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करेन. अशी माझी प्रतिमा कोणीही डागाळू शकत नाही,' असे करणने म्हटले.

चारूला मी एका कार्यक्रमातच भेटलो

चारूबद्दल बोलताना करण म्हणतो, 'मी चारूला एका कार्यक्रमादरम्यानच भेटलो. तेथे असलेले फोटो आणि व्हिडिओ हे त्या कोलॅबोरेशनचा एक भाग होते. मी चारूशी बोलतही नाही. गेल्या दीड वर्षात मी फक्त कामानिमित्त मुंबईत येतो. आज सकाळपासून चारू मला सॉरीचे मेसेज पाठवत आहे, तिलाही राजीवच्या या कृत्याचे खूप वाईट वाटले आहे. मात्र, मी गप्प बसणारा नाही. याचे उत्तर आता राजीव याला न्यायालयात द्यावे लागणार आहे,' असे करणने स्पष्ट शब्दांत सांगितले.

मी करणला 'सॉरी'चा मेसेजही पाठवला
राजीव इतक्या खालच्या पातळीवर जाईल, यावर माझा विश्वास बसत नाहीये. तो माझे नाव त्या व्यक्तीशी जोडत आहेत, ज्याच्याशी माझी मैत्रीदेखील नाही. राजीवने माझ्यावर करणसोबत अफेअर असल्याचा आरोप केला. माझ्यावर विश्वास ठेवा, मी करणला एका कार्यक्रमातच भेटले होते. त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला, करण हा त्याचा एक भाग होता हे मला माहितही नव्हते, कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही काही वेळ एकमेकांशी बोललो, काही रील केले आणि नंतर एकमेकांचा निरोप घेऊन निघालो. अफेअर सोडा, त्या कार्यक्रमानंतर आम्ही एकमेकांच्या संपर्कातही नाही. राजीव त्या रीलच्या आधारे अफेअर असल्याचे बोलत आहे. तो एवढ्या खालच्या पातळीचा विचार करतोय, यावर माझा विश्वास बसत नाहीये. विनाकारण आमच्या प्रकरणात करणचे नाव ओढले गेल्याने मी त्याला 'सॉरी' मेसेजही पाठवला आहे. लाज वाटतेय, पण मी काय करू?,' असे चारू म्हणाली.

खूप उदास वाटत आहे
चारू पुढे म्हणाली, 'लोक आता माझ्यापासून अंतर ठेवत आहेत. त्यांना भीती आहे की, राजीव त्यांचे नाव माझ्याशी जोडले तर... माझे मित्र माझ्याशी बोलायला तयार नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून मला काम मिळत नाहीये. प्रोफेशनली आणि पर्सनली लोक माझ्याशी संपर्क ठेऊ इच्छित नाहीयेत. मला समजत नाही की मी भविष्यात कसे सर्व्हाइव करेल. माझी मुलगी ही माझी मोठी जबाबदारी आहे, मी काम करणार नाही तर तिची काळजी कशी घेणार? मी पूर्णपणे कोलमडले आहे. खूप उदास वाटत आहे, मी सातत्याने या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे,' असे हताश होऊन चारू म्हणाली.

शक्य तितक्या लवकर मी कायदेशीर कारवाई सुरू करेन आणि नवीन दिशेने वाटचाल करेन
'राजीवने माझी एक-दोनदा नव्हे, तर अनेकदा फसवणूक केली आहे. अलीकडेच मी त्याला एका हॉटेलमध्ये पकडले. पाच दिवसांनी तो दिल्लीला पळून गेला. मी त्याला नेहमीच संधी दिली, मला वाटले की तो बदलेल आणि जबाबदार होईल, परंतु तसे झाले नाही. त्याला संधी देऊन मी मोठी चूक केली होती. मी खूप कमजोर झाले होते, प्रत्येक वेळी मी राजीव कुठे असेल कुणाबरोबर असेल, असाच विचार मी करत राहिले. याचे कारण देखील राजीव स्वतः आहे, कारण त्याने माझी अनेकदा फसवणूक केली आहे. तो खूप खोटे बोलतो. मी आता त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. मला आता मागे वळून बघायचे नाही. आता मला फक्त माझ्या बाळावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि काम करायचे आहे. शक्य तितक्या लवकर मी कायदेशीर कार्यवाही सुरू करेन आणि नवीन सुरुवातीच्या दिशेने वाटचाल करेन,' असे चारू म्हणाली.

माझ्या आईलासुद्धा मीच चुकीची वाटतेय
चारूने पुढे सांगितले, 'मी अतिशय परंपरावादी कुटुंबातील आहे. माझ्या आईला मी हे लग्न मोडावे असे वाटत नाही, साहजिकच याआधी माझे पहिले लग्न मोडले आहे, त्यामुळे आता माझ्या आईच्या म्हणण्यानुसार माझा जीव गेला तरी चालेल पण ती माझे हे दुसरे लग्न मोडू देणार नाही. मलाही एक लहान बहीण आहे आणि माझ्या बहिणीवरही याचा परिणाम होत असल्याचे माझ्या आईला वाटते. राजीवने माझ्या आईला करणबद्दल सांगितले आणि तिलाही त्यात माझी चूक दिसली. मात्र, आता मी राजीवपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून आता मी या निर्णयापासून मागे हटणार नाही.'

बातम्या आणखी आहेत...