आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग अपडेट:अक्षय कुमार स्टारर 'रक्षाबंधन'साठी स्टुडिओत उभारली चाळ, एप्रिलनंतर अक्षय करणार चित्रीकरणाला सुरुवात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षय आधी 'बच्चन पांडे'चे शूटिंग पूर्ण करेल. त्यानंतर 'रक्षाबंधन'वर काम करेल.

अक्षय कुमारकडे सध्या बरेच चित्रपट आहेत. यापैकी त्याच्या आगामी 'रक्षाबंधन' या चित्रपटावर कामही जोरात सुरू आहे. बातमीनुसार स्टुडिओमध्येच निर्मात्यांनी चित्रपटासाठी चाळींचा सेट लावला आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत हा शूटिंगसाठी तयार होईल. तोपर्यंत अक्षय 'बच्चन पांडे'चे शूटिंग पूर्ण करेल. त्यानंतर 'रक्षाबंधन'वर काम करेल.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर अक्षयने या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. 'रक्षाबंधन'चे दिग्दर्शन आनंद एल राय करणार आहेत, ज्यांच्यासोबत अक्षय 'अतरंगी रे' वरही काम करत आहे. या चित्रपटाची कथादेखील आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा या जोडीने लिहिली आहे. हा चित्रपट यावर्षी 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची घोषणा करताना आनंद म्हणाले होते, 'रक्षाबंधन' हा आमचा आणखी एक चित्रपट आहे. याची कथा खूप खास आहे. हा नात्यांचा उत्सव आहे.'

‘बस बहनें देती है 100% रिटर्न’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. ‘तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी कथा आहे. माझ्या करिअरमध्ये मी आतापर्यंत सर्वांत कमी वेळात साइन केलेला हा चित्रपट आहे. हा चित्रपट मी माझी बहीण अल्का हिला आणि जगातलं सर्वांत खास बहीण-भावाच्या नात्याला समर्पित करतो’, असे कॅप्शन अक्षयने चित्रपटाच्या पोस्टरला दिले होते. या चित्रपटाची निर्मितीदेखील अक्षयची बहीण अल्का आणि दिग्दर्शक आनंद एल राय मिळून करत आहेत. या चित्रपटामध्ये अक्षयच्या चार बहिणी असल्याचे ट्रेड पंडितांचे म्हणणे आहे. यात अक्षय आणि अल्काची रिअल लाइफ बॉन्डिंगदेखील दिसणार आहे. अक्षय कुमार आणि आनंद एल राय यांनी या लॉकडाऊनमध्ये हा चित्रपट फायनल केला. या दोघांमध्ये तीन चित्रपटांची डील झाली आहे.

अक्षयचे आगामी प्रोजेक्ट्स
लवकरच अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरैशी आणि आणखी काही बॉलिवूड कलाकार दिसणार आहेत. याशिवाय अक्षयचा ‘अतरंगी रे’ आणि ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. याशिवाय 'पृथ्वीराज' आणि 'राम सेतु'सारखे चित्रपटदेखील त्याच्या हातात आहेत. सध्या तो 'बच्चन पांडे' चित्रपटाच्या शूटिंगबरोबरच 'राम सेतू' चित्रपटाचे वाचनही करत आहे.

बातम्या आणखी आहेत...