आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि 'चिनी कम' या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून दिसलेली अभिनेत्री स्विनी खरा हिचा नुकताच उर्विश देसाईसोबत साखरपुडा झाला. उर्विश आणि स्विनी बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्विनीने इन्स्टाग्राम हँडलवर साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत स्विनीने लिहिले- 'मी तुला कागदाची अंगठी घालून तुझ्याशी कधीच लग्न केले आहे.'
सोशल मीडियावर स्विनीच्या एंगेजमेंटची छायाचित्रे पाहून चाहत्यांना 'चिनी कम'मधील चिमुरडीची आठवण झाली. स्विनीने या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
बघूया स्विनी आणि उर्विशच्या एंगेजमेंटचे फोटो-
गुलाबी लेहेंग्यात दिसली स्विनी, उर्विशने परिधान केली काळ्या रंगाची शेरवानी
स्विनीने तिच्या एंगेजमेंटला गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. तर तिचा भावी पती उर्विश काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. उर्विश देसाईने तिला गुडघ्यावर बसवून प्रपोज केले आणि अंगठी घातली. नंतर दोघांनी एकत्र डान्सही केला.
सेलेब्स आणि चाहत्यांनी केला दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव
उर्विश आणि स्विनीच्या या फोटोंवर चाहते आणि सेलेब्स कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. टीव्ही अभिनेत्री अविका गौरने या जोडप्याला साखरपुड्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेता मार्कंड सोनी यानेही स्विनी आणि उर्विशला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
कोण आहे स्विनीचा भावी पती उर्विश देसाई?
मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्विशबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. पण त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुपर स्लाईड्स लिहिले आहे. लिंक्डइनवर दिलेल्या माहितीनुसार, उर्विश मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तो सुपर स्लाईड्स नावाच्या कंपनीचा संचालक आहेत.
स्विनीचे करिअर
स्विनीने तिच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 2005 मध्ये तिने 'परिणिता' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'बा बहू और बेबी' या मालिकेतून तिने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात केली होती. स्विनी शेवटची दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात दिसली होती. 11 वर्षांच्या कारकिर्दीत स्विनीने 11 चित्रपट आणि 4 टीव्ही शो केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.