आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन कुकिंग:शेफ रकुलप्रीतने कुटुंबियांसाठी बनवला पास्ता, व्हिडिओ शेअर करुन म्हणाली - एवढी मेहनत मी आजपर्यंत केली नाही 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रकुलप्रीतने स्वत:चा 'शेफ रकुल' असा उल्लेख करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री रकुलप्रीत सिंगही घरी आहे आणि काहीतरी नवीन करण्यात वेळ घालवत आहे. सोमवारी किचनमध्ये एक्सपिरिमेंट करत असताना तिने घरातील सदस्यांसाठी पास्ता बनवला आणि स्वत:चा 'शेफ रकुल' असा उल्लेख करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.  रकुलप्रीतने आपल्या इन्स्टा स्टोरीवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती किचनबाहेर हातात पास्ताचे दोन बाऊल घेऊन उभी दिसतेय आणि नंतर म्हणते 'शेफ रकुल तुमच्या समोर सादर आहे. मी आतापर्यंत केलेले सर्वात कठीण काम आहे. आज आमच्याकडे पास्ताचे दोन प्रकार आहेत, माझ्यासाठी पेस्टो पास्ता आणि व्हाईट सॉस पास्ता जे इतक खाऊ शकतील कारण हे मलाईयुक्त आणि चरबी वाढवणारे आहे. आता मी खूप कष्ट केले आहेत आणि मी ते खाणार आहे. '

  • रकुल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते

अजय देवगन आणि तब्बूसारख्या कलाकारांसह 'दे-दे प्यार दे' सारखा चित्रपट करणारी रकुलप्रीत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. विशेषत: लॉकडाऊननंतर ती सतत नवनवीन क्रिएटिव्हिटी करून तिच्या चाहत्यांशी संपर्क साधत असते. यावेळी तिने फिटनेस व्हिडिओ, योगा व्हिडिओ, हँडवॉश चॅलेंज व्हिडिओंसह अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...