आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बरकतीचा हात:किन्नर आखाडा प्रमुख लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्यासोबत मिळून शेफ विकास खन्ना यांनी 20 लाख लोकांपर्यंत पोहोचवले जेवण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विकास यांनी फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना लॉकडाऊनच्या काळात निराधार आणि भुकेलेल्यांना मदत करण्यासाठी फीड इंडिया अभियान चालवत आहेत. या चांगल्या कार्यात त्यांना एनडीआरएफ टीमची साथ देत आहे. या मोहिमेतील त्यांना आता बिग बॉस फेम किन्नर आखाडा प्रमुख लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांचीही सोबत मिळाली आहे. 'बरकत' नावाच्या या मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 20 लाख लोकांपर्यंत जेवण पोहोचवण्यात आले आहे.  त्याचा व्हिडीओ विकास यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. ही संख्या एकत्र करून, त्यांनी आतापर्यंत 120 लाखांहून अधिक गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचवले आहे.

  • स्वतः लक्ष्मीनारायण यांनी दिली 'बरकत'

यापूर्वी विकास यांनी आणखी एका व्हिडीओच्या माध्यमातून किन्नर गुरु लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या या सल्ल्याबद्दल सांगितले होते.  त्यांनी अपंग, तृतीयपंथी, सेक्स वर्कर्स, एड्स रूग्ण, अनाथाश्रम, कुष्ठरोगी व वृद्धाश्रमांनाही अन्न पुरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला होता. 

  • 120 लाखांहून अधिक लोकांपर्यंत अन्न पोहोचवले

विकास यांनी शुक्रवारी एक व्हिडीओ शेअर केला आणि सांगितले की, एनडीआरएफच्या टीमसोबत मिळून त्यांनी आतापर्यंत 120 लाख लोकांपर्यंत पोहोचले आहे. विकास न्यूयॉर्कमध्ये आहेत, परंतु गरजूंना अन्न पुरवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. न्यूयॉर्कमध्ये असल्याने ते या बरकत कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाही. परंतु काही मित्रांनी फोटो एडिटिंगच्या माध्यमातून त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा आनंद दिला. विकास यांनी फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

<

0