आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींच्या घरात पाणी टंचाई:अमिताभ बच्चन यांच्या घरात पाण्याची समस्या, ब्लॉगवर चाहत्यांना सांगितली अडचण; म्हणाले - सकाळी सहाला उठलो तेव्हा...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजचा दिवस थोडा कठिण होता, असे ते म्हणाले.

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन 27 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चेहरे या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आता बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या घरातील एक समस्या मांडली आहे. घरात पाणी नसल्याचे बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’च्या शूटिंगसाठी ते सकाळी सहा वाजता उठले तेव्हा त्यांच्या घरात पाणी येत नव्हते. इतकेच नाही तर त्यांनी त्यांच्या या घरगुती समस्यांमध्ये चाहत्यांना सामील करून त्यांची माफीदेखील मागितली आहे.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले, 'मला केबीसीच्या शूटिंगसाठी निघायचे होते. मी सकाळी सहा वाजता उठलो आणि पाहिले तर घरात पाणी येत नव्हते. आता परत पाणी येत नाही तोपर्यंत मला कनेक्ट होण्यासाठी वेळ मिळाला. यानंतर मी कामसाठी निघेन आणि थेट व्हॅनिटीमध्येच तयार होईल. ओह डियर, या घरगुती समस्यांमध्ये तुम्हाला सामील करून घेतल्याबद्दल माफी मागतो. पण ठिक आहे आता नाही बोलणार. आजचा दिवस थोडा कठिण होता,' असे ते म्हणाले.

ब्लॉगमध्ये 'चेहरे' चित्रपटाबद्दल बिग बी म्हणाले...
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ‘चेहेरे’ चित्रपटाबद्दलही लिहिले आहे. त्यांनी सांगितले की हा चित्रपट सर्वत्र नव्हे तर काही निवडक राज्यांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ते म्हणाले, "नियमानुसार चित्रपटगृहे उघडण्याची प्रतीक्षा करा. तोपर्यंत आम्ही येथे काम करत आहोत," चेहरे या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह इम्रान हाश्मी, क्रिस्टल डिसूझा, अन्नू कपूर आणि रिया चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 78 वर्षीय अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ते लवकरच 'ब्रह्मास्त्र', 'मेडे', 'गुडबाय' आणि 'द इंटर्न' सारख्या चित्रपटांमध्येही दिसतील.

बातम्या आणखी आहेत...