आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Chehre: Amitabh Bachchan Made A World Record By Speaking A Monologue Of 8 Minutes In One Take, The Video Will Be Used For Women's Safety

चेहरे:अमिताभ बच्चन यांनी एका टेकमध्ये 8 मिनिटांचा मोनोलॉग बोलून केला विश्वविक्रम, महिलांच्या सुरक्षेसाठी वापरला जाईल व्हिडिओ

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा व्हिडिओ आता महिलांच्या सुरक्षेसाठी वापरला जाईल.

अभिनेता कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा' चित्रपटात 7 मिनिटांचा दीर्घ संवाद बोलून चर्चा एकवटली होती. आता अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 'चेहरे' या चित्रपटात 8 मिनिटांचा मोनोलॉग बोलत त्याचा विक्रम मोडला आहे. या मोनोलॉगची विशेष गोष्ट म्हणजे हा 8 मिनिटांचा संवाद स्वतः बिग बींनी लिहिला आहे आणि एका टेकमध्ये तो पूर्ण केला आहे. हा मोनोलॉग महिलांवरील हिंसाचारावर तयार करण्यात आला आहे, हा व्हिडिओ आता महिलांच्या सुरक्षेसाठी वापरला जाईल.

अमिताभ यांच्या मोनोलॉगवर निर्माता आनंद पंडित म्हणाले, "जगातील कोणत्याही अभिनेत्याने एखाद्या कोणत्याही विषयावर इतका मोठा संवाद डिलिव्हर केलेला नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही बच्चन साहेबांची कल्पना होती. त्यांचे म्हणणे होते की, चित्रपटात बलात्कार आणि महिलांच्या सुरक्षेवरील हा संवाद यूनिव्हर्सल लेव्हलवर प्रगती करेल आणि ते बरोबर होते.'

आनंद पंडित पुढे म्हणाले, या मोनोलॉगमधील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे बच्चन साहेबांनी स्वतः हा संवाद लिहिला आहे. त्यांनी तो एकाच टेकमध्ये सादर केले आहे, त्यानंतर आम्ही सर्वांनी त्याचे कौतुक केले. आता आम्ही 8 मिनिटांच्या या मोनोलॉगचा महिलांच्या सुरक्षेवर व्हिडिओ बनवण्याचा विचार करत आहोत जे प्रत्येक संस्थेला महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी मोफत दिला जाईल.

अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी, रिया चक्रवर्ती आणि क्रिस्टल डिसूझा स्टारर चेहरे हा चित्रपट 27 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरींनी केले तर निर्माते आनंद पंडित हे आहेत.

बातम्या आणखी आहेत...