आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चेहरे':दिग्दर्शक रुमी जाफरी यांचा खुलासा, सांगितले - 'त्या' दिवशी माझ्यामुळे बिग बींना उपाशी झोपावे लागले होते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या पोलंडमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नेमके काय झाले होते...

अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी, रिया चक्रवर्ती आणि क्रिस्टल डिसूझा स्टारर 'चेहरे' हा चित्रपट 27 ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होतोय. हा चित्रपट रुमी जाफरी यांनी दिग्दर्शित केला आहे. अलीकडेच एका मुलाखतीत रुमी जाफरी यांनी या चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितले की, त्यांच्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यावर उपाशी झोपायची वेळ आली होती.

माझ्यामुळे बिग बींना उपाशी झोपावे लागले : रूमी जाफरी
दिग्दर्शक रूमी जाफरी सांगतात, 'बिग बींसोबत काम करण्याचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय असतो. मी भाग्यवान आहे. 'चेहरे’ त्यांच्यासेाबतचा माझा चौथा चित्रपट आहे. आम्ही जेव्हा पोलंडच्या एका डोंगराच्या वरती बनलेल्या रिसॉर्टमध्ये याचे शूटिंग करत होतो, तेव्हा मी लोकेशन जवळच थांबलो होतो, मात्र अमिजी लोकेशनपासून थोडे दूर एका हॉटेलमध्ये थांबलेले होते. माझी पत्नीदेखील माझ्यासोबत पोलंडला गेली होती. अमितजी जेव्हा शूटिंग करुन परत येतील तेव्हा माझी पत्नी त्यांना जेवणाचा डबा पाठवून देईल, असे आमच्यात ठरले होते. आम्ही इकडून ड्रायव्हरच्या हाती डबा पाठवला, तिकडे अमितजीदेखील वाट पाहत होते, कारण ते साडे सात वाजेपर्यंत जेवण करतात. मात्र बर्फ पडत असल्याने रस्ते जाम झाले आणि ड्रायव्हर वाहतुकीत अडकला. शिवाय अमितजींनी हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली नव्हती. थंडीत हॉटेल लवकर बंद झाले होते. त्यामुळे त्या रात्री अमितजींना उपाशी झोपावे लागले. मात्र त्यांनी तक्रार केली नाही.'

रुमी जाफरी यांना झाली आहे कोरोनाची लागण

दिग्दर्शक रुमी जाफरी सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. रुमी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल 15 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला, त्याच्या आठवड्याभरापूर्वीच त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते. चेहरे हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतोय. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, हा चित्रपट आधी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, त्यामुळे चित्रपटाची सर्व तयारी आधीच पूर्ण झाली आहे.

सध्या रुमी हैदराबादमध्ये आयसोलेटेड आहे, त्यामुळे ते लवकरच पुन्हा चाचणी करुन घेणार आहे. जर रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वेळी दिग्दर्शक मुंबईला येतील. आणि जर हे शक्य झाले नाही तर ते हा चित्रपट रिलीजच्या दिवशी हैदराबादमध्येच पाहतील.

रुमी जाफरी यांची मुलगी अलफियाचे लग्न ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हैदराबादमध्ये झाले होते. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. या लग्नाला रिया चक्रवर्ती आणि क्रिस्टल डिसूझा यांनीही हजेरी लावली होती.

बातम्या आणखी आहेत...