आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये कोरोना:दुस-यांदा पॉझिटिव्ह आली 'चेन्नई एक्स्प्रेस'चे निर्माते करीम मोरानींची टेस्ट, दोन्ही मुली झाल्या ठिक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीम मोरानी 8 एप्रिलपासून मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल आहेत.

चित्रपट निर्माते करीम मोरानी यांची कोरोनाव्हायरसची चाचणी दुस-यांदा सकारात्मक आली आहे. 'रा-वन' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटाचे निर्माते मोरानी यांना 8 एप्रिलला मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यामध्ये विषाणूची कोणतीही लक्षणे नव्हती. पण त्यांची चाचणी सकारात्मक आली होती. रिपोर्ट्सनुसार, त्यांची पुन्हा कोरोनाव्हायरसची चाचणी करण्यात आली असून तिचा अहवाल सकारात्मक आला आहे. 

  • दोन हार्ट अटॅक आणि एक बायपास सर्जरी झाली आहे

वृत्तानुसार, मोरानी कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंताग्रस्त आहेत. 60 वर्षांच्या मोरानी यांना यापूर्वी दोनदा हृदयविकाराचा झटका आला होता. एकदा त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया देखील झाली आहे.

  • दोन्ही मुली ब-या होऊन घरी परतल्या

मोरनी यांच्या मुली झोया आणि शाजा या दोघींचीही कोरोना टेस्ट सकारात्मक आली होती. आता दोघीही ब-या झाले आहेत आणि घरी परतल्या आहेत. झोयाला मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी आणि शाजाला नानावटी रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. वृत्तानुसार, शाजा मार्चच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेतून परत आली होती, तर झोया मार्चच्या मध्यात राजस्थानला गेली होती.

बातम्या आणखी आहेत...