आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने गद्दार ठरवून हकललेली अभिनेत्री:व्हिसा न मिळाल्याने घटस्फोट, 4 लाख सेक्स स्लेव्ससाठी जपान सरकारला झुकवले

इफत कुरेशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये ली सियांग-लान आणि री कोरेन
जपानमध्ये योशिको यामागुची
अमेरिकेत शर्ली यामागुची
आणि जपानी टीव्ही चॅनेलवर योशिका ओटाका….

ही पाच नावे एकाच महिलेची आहेत. खरे नाव योशिको यामागुची... चीन आणि जपान या दोन्ही देशांत ती आघाडीची अभिनेत्री होती, पण तिचे आयुष्य एखाद्या थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नव्हते. दुसऱ्या महायुद्धात, जेव्हा चीन आणि जपान एकमेकांचे कट्टर शत्रू होते, तेव्हा ती चीनमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. त्यावेळी ती मूळची जपानी असल्याचे फार कमी लोकांना माहीत होते. चीन सरकारला याची माहिती मिळताच तिला अटक करण्यात आली. नऊ महिने तुरुंगात ठेवले. त्यानंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कशीतरी फाशीची शिक्षा रद्द झाली, परंतु चीनने तिला देशातून हाकलून दिले.

जपानमध्ये पुन्हा करिअर सुरू केले. तिथेही ती आघाडीची अभिनेत्री बनली, पण राजकारणाने तिचे आयुष्य बदलून टाकले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, जपानी सैन्याने कोरियन, चिनी आणि फिलिपिनी महिलांना त्यांच्या सैन्य तळावर वेश्या व्यवसाय (कम्फर्ट वूमन) करण्यास भाग पाडले. जपानी सैनिकांनी या कम्फर्ट वूमनवर खूप अत्याचार केले. या मुद्द्यावर जपानी सैन्याविरुद्ध बोलणारी ती पहिल्या जपानी राजकारणी होती. जेव्हा सर्व जपानमधील नेते कम्फर्ट वूमनच्या मुद्द्यावर जपानी सैन्याच्या बाजूने उभे होते, तेव्हा योशिको यामागुचीने संपूर्ण जपानमध्ये जनजागृती मोहीम राबवली.

योशिको यामागुचीच्या आयुष्यातील हे दोन पैलू होते, पण संपूर्ण आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. पहिले प्रेम अपूर्णच राहिले. दोनपैकी एक लग्न अयशस्वी झाले. चीन, जपान, अमेरिकेत वेगवेगळ्या नावाने काम केले कारण तिच्यावर हेरगिरी, देशद्रोह असे आरोप होते.

तर, आजच्या न ऐकलेल्या किश्श्यांमध्ये अभिनेत्री योशिको यामागुचीची कहाणी जाणून घेऊया, जिने आपल्याच देशाच्या सैन्याकडून अत्याचार झालेल्या महिलांसाठी आवाज उठवला.

योशिको यामागुचीचा जन्म 12 फेब्रुवारी 1920 रोजी मंचुरिया (रिपब्लिक ऑफ चायना) येथे झाला. तिचे जपानी वडील फुमिओ हे दक्षिण मंचूरिया रेल्वेत काम करायचे. चिनी प्रथेनुसार, प्रत्येक मुलाचा एक गॉडफादर बनवला जातो, जो त्याचे नाव ठेवतो. अशा परिस्थितीत, योशिकोचा गॉडफादर चिनी बनला, ज्याने तिला ली सियांग-लॅन आणि पॅन शुहुआ ही दोन चिनी नावे दिली, जी नंतर तिची स्क्रीनवरील नावे बनली.

टीबी झाला तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने संगीत शिकली

वयाच्या 13 व्या वर्षी योशिकोला क्षयरोग म्हणजेच टीबी झाला. श्वासोच्छवासाचा त्रास दूर करण्यासाठी, डॉक्टरांनी तिला आवाजाचे धडे घेण्यास सांगितले. घरच्यांना तिला पारंपारिक जपानी संगीत शिकवायचे होते, पण योशिको पाश्चात्य संगीत शिकली. योशिकोने संगीतासोबतच तिचे शालेय शिक्षण बीजिंगमधून केले.

योशिकोच्या आवाजाने प्रभावित झाल्याने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी तिला रेडिओवर चीनी धून गाण्याची संधी मिळू लागली.

पहिल्याच चित्रपटाने स्टार बनवले

1938 मध्ये, योशिकोने मन्युरियो फिल्म प्रोडक्शनच्या 'हनीमून एक्सप्रेस'मधून चीनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अभिनयासोबतच तिने गाणीही गायली आहेत.

खरे नाव लपवून स्टेजच्या नावाने ओळख निर्माण केली
चिनी चित्रपटांसाठी तिने तिचे स्क्रीनवरचे नाव जपानी योशिको गामागुची वरून बदलून चीनी नाव ली सियांग-लॅन केले. वास्तविक तिने आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी हे केले. पहिल्याच चित्रपटापासून, सुंदर योशिको एक स्टार बनली, तिला जपानी आणि चायनीज या दोन भाषा अवगत होत्या आणि गाणे तसेच अभिनय कसे करावे हे माहित होते. वर्षानुवर्षे, योशिको यामागुची हिला ली सियांग लॅन नावाने चित्रपटांमध्ये श्रेय देण्यात आले.

नावाचे सत्य समोर येताच वाद निर्माण झाला

योशिकोने ज्या चिनी सहकलाकारांसोबत काम केले होते त्याच्यापासूनही ती जपानी असल्याचे लपवून ठेवले होते. योशिको बहुतेक जपानी लोकांसोबत राहत होती, तिला स्थानिक चायनीज डिश सोरघमऐवजी पांढरा व्हाइट राइस देण्यात येत होता. सोबतच तिला चीनी कलाकारांपेक्षा 10 पट जास्त मोबदला दिला जात होता. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतरही सहकलाकारांना ती जपानी असल्याची शंका आली नाही.

योशिको ही एक चिनी नायिका होती, परंतु तिच्या बहुतेक चित्रपटांनी टोकियोमधील जपानी राष्ट्रीय धोरण किंवा मंचूरियन हितसंबंधांना प्रोत्साहन दिले. चीन-जपानी युद्धापूर्वी, योशिकोने आपली ओळख लपविण्याकडे किंवा उघड करण्याकडे कधीच लक्ष दिले नाही, परंतु चीन-जपान युद्धानंतर ही अडचण तिचे आयुष्य उध्वस्त करण्याचे कारण बनली.

पहिले प्रेम आणि अधुरी प्रेम कहाणी
चित्रपटांमध्ये काम करत असताना, योशिकोची जपानी डिप्लोमॅट योसुके मात्सुओका यांचा मुलगा केनिचिरो मात्सुओकाशी भेट झाली. आपली बायोग्राफी री कोरेन: माय हाफ लाइफमध्ये, योशिकोने तिच्या पहिल्या प्रेमाचे वर्णन केले. योशिकोला केनिचिरोशी लग्न करायचे होते, पण शिक्षणामुळे ती लग्नास तयार नव्हती. त्यामुळे योशिकोने स्वतःला त्याच्यापासून दूर केले. अनेक वर्षांनंतर म्हणजे जेव्हा दुसरे महायुद्ध संपले, तेव्हा दोघे ज्या ठिकाणी प्रेमात पडले होते तिथे भेटले. परंतु तोपर्यंत वास्तुविशारद इसामू नोगुचीशी योशिकाचे नाव जोडले गेले होते.

जपानी अभिनेत्याने मारली थप्पड, चित्रपट वादात सापडला होता
1940 मध्ये योशिको 'चायना नाईट' या चित्रपटात दिसली. जपानी सैनिकांची सकारात्मक प्रतिमा दाखवल्यामुळे जपानी राष्ट्रीय धोरणावर आधारित हा चित्रपट डब करण्यात आला. या चित्रपटात योशिकोने एका जपानी मुलाच्या प्रेमात पडलेल्या जपानविरोधी मुलीची भूमिका केली होती. चित्रपटाच्या एका दृश्यात जपानी अभिनेता योशिकोला थप्पड मारताना दिसला, त्यामुळे बराच गदारोळ झाला. एका चिनी अभिनेत्रीला जपानी अभिनेत्याने थप्पड मारल्याचे पाहणे चिनी लोकांना सहन झाले नाही. त्यावरून बराच वाद झाला आणि अनेक शहरांमध्ये या चित्रपटावर बंदीही घालण्यात आली. असे असतानाही या चित्रपटाची 23 हजार तिकिटे विकली गेली.

चित्रपटातील गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती
योशिकोच्या सुजाऊ सेरेनाड या गाण्यावर चीनमध्ये महायुद्धानंतर बंदी घालण्यात आली होती. एका कार्यक्रमात चिनी पत्रकारांनी तिला अशा गाण्याचा भाग असल्याबद्दल सुनावले होते. तेव्हा योशिकोने तिची ओळख उघड करण्याऐवजी गाण्यात सामील झाल्याबद्दल चिनी पत्रकारांची माफी मागितली होती.

जपानमध्ये ओळख उघड झाली
सतत चीनची बाजू घेणाऱ्या आणि स्वतःला चिनी नावाने ओळखल्या जाणा-या योशिकोवर जपानी लोकांची नाराजी वाढू लागली. जपान-चीनचे सदिच्छा दूत म्हणून योशिको जपानला पोहोचली तेव्हा बराच गदारोळ झाला. जपानमधील कार्यक्रमादरम्यान योशिको पारंपरिक चीनी पोशाख परिधान करून पोहोचली होती. विमानतळाच्या कस्टम अधिकाऱ्याने तिला अडवले आणि म्हटले, आपण जपानी, चायनीज लोकांपेक्षा वरचढ आहोत हे तुला माहीत नाही का, तुला हे तृतीय श्रेणीचे कपडे घालून त्यांची भाषा बोलायला लाज वाटत नाही का? योशिको कार्यक्रमात येताच जपानी पत्रकारांनी तिची खरी जपानी ओळख उघड केली.

दुसरे महायुद्ध संपताच योशिकोला शांघायमधून अटक करण्यात आली
योशिको जपानी असल्याची बातमी पसरताच संतप्त चिनी लोक तिच्या जीवावर बेतले. योशिको शांघायला परत येताच, तिला चिनी असूनही जपानी लोकांसोबत काम केल्याबद्दल फायरिंग स्क्वॉडने अटक केली आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. तिला 8 डिसेंबर 1945 रोजी शांघायमधील हॉर्स ट्रॅकवर फाशी देण्यात येणार होती. त्याचवेळी बीजिंगमध्ये योशिकोच्या पालकांनाही अटक करण्यात आली होती. योशिकोला फाशी देण्यापूर्वी, तिच्या एका मित्राने तिच्या पालकांना भेटून तिचे जन्म प्रमाणपत्र मिळवले. मित्राने गुपचूप हेडला हे प्रमाणपत्र दिले, ज्यात स्पष्टपणे नमूद केले होते की योशिको अर्धी चिनी आणि अर्धी जपानी आहे, परंतु तिच्याकडे जपानी नागरिकत्व आहे. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर योशिकोवरील सर्व आरोप फेटाळण्यात आले.

न्यायालयाने देश सोडण्याचे आदेश दिले होते
फाशीची शिक्षा रद्द झाल्यानंतर शांघाय न्यायालयाने योशिकोला देश सोडण्यास सांगितले होते, कारण संतप्त लोक तिची हत्या करू शकतात, असे म्हटले गेले होते. योशिको शेवटी 1946 मध्ये चीनमधून जपानला आली.

चीनचे लोक 2 महायुद्धानंतर योशिकोला जपानी गुप्तहेर मानत राहिले, तिला देशद्रोही म्हटले गेले होते. तिच्यावर गुप्तहेर असल्याचा आरोप होता, त्यामुळे तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोर्टाने देश सोडण्याचा आदेश दिल्यानंतर ज्या देशात तिला स्टारचा दर्जा मिळाला होता, त्या चीनला योशिकोने 50 वर्षे भेट दिली नाही. अनेक वर्षांनंतरही लोक तिला देशद्रोही म्हणतील असे योशिकोला वाटायचे. योशिकोने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते - माझा दोष एवढाच होता की मी चीनमध्ये राहून जपानी लोकांच्या हिताच्या चित्रपटांमध्ये काम केले.

जपानमध्ये येऊन चिनी चित्रपटात काम केल्याबद्दल माफी मागितली
1946 मध्ये जपानमध्ये आल्यावर योशिकोने चिनी चित्रपटांमध्ये काम केल्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली. योशिकोच्या म्हणण्यानुसार, तिचा उपयोग प्रचारात्मक चित्रपट बनवण्यासाठी केला गेला होता.

जपानमध्ये येऊन तिने तिच्या अभिनय कारकिर्दीला पुन्हा सुरुवात केली, पण यावेळी तिचे खरे नाव योशिको यामागुची. तिचे बहुतेक चित्रपट हे जपान-चीन युद्धाच्या कथांभोवती फिरणारे होते, ज्यांना खूप पसंती मिळाली.

हॉलिवूडसाठी पुन्हा नाव बदलले आणि लग्न केले
हॉलिवूडमध्ये काम करत असताना 1951 मध्ये योशिको यामागुचीने जपानी अमेरिकन शिल्पकार इसामू नोगुचीशी लग्न केले. जपान आणि चीनशी ओळख असल्याने, योशिको यामागुचीने नेहमीच स्वतःला दोन्ही देशांमध्‍ये विभागलेले पाहिले. आपल्या आत्मचरित्रात योशिकोने लिहिले की, तिचा नवरा इसामू देखील दोन देशांमध्ये राहत होता, म्हणून ती पटकन त्याच्याकडे आकर्षित झाली. यामागुचीला मुले हवी होती, पण तिचा दोनदा गर्भपात झाला. आपण मुले जन्माला घालण्यास योग्य नसल्याचे तिच्या लक्षात आले.

हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत असताना तिला लाइमलाइट (1952) या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचे नाव चार्ली चॅप्लिनसोबत जोडले गेले.
हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत असताना तिला लाइमलाइट (1952) या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचे नाव चार्ली चॅप्लिनसोबत जोडले गेले.

देशद्रोहाच्या आरोपाखाली व्हिसा न मिळाल्याने लग्न मोडले
1952 मध्ये, योशिकोचा पती इसामू अमेरिकेत असताना अमेरिकेने तिला व्हिसा नाकारला. दोघांमध्ये पत्राद्वारे संवाद झाला. एका पत्रात योशिकोने तिच्या पतीला लिहिले आहे की, "मला लवकरच व्हिसा मिळाला नाही, तर आम्ही घटस्फोट घेऊ, कारण माझ्यावरील आरोपांचा तुमच्या खासगी आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम होत आहे."

1956 मध्ये इसामूपासून घटस्फोट घेतल्यानंतर, योशिको हाँगकाँगमध्ये ली सियांग लॅन नावाने डझनभर चीनी भाषेतील चित्रपटांमध्ये दिसली. हे नाव ती यापूर्वी चीनी चित्रपटांसाठी वापरत होती. यापैकी बहुतेक चिनी चित्रपट स्टुडिओला लागलेल्या आगीत नष्ट झाले आणि त्यांचा कोणताही मागमूस उरला नाही.

चित्रपटांपासून दूर आणि दुसरे लग्न

1958 मध्ये जपानी डिप्लोमॅट हिरोशी ओटाका यांच्याशी लग्न करून योशिकोने चित्रपट जगताला रामराम ठोकला. चित्रपटांमधून निवृत्ती घेतल्यानंतर योशिकोला गृहिणी व्हायचे होते.

1969 मध्ये, योशिको द थ्री ओ क्लॉक यू शोची होस्ट बनली, ज्यामुळे तिला व्हिएतनाम युद्ध आणि इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाचे कव्हरेज करता आले. या कव्हरेजचा योशिकोवर इतका खोल परिणाम झाला की त्यानंतर तिने पॅलेस्टाईनला पाठिंबा देत 1970 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1974 मध्ये, योशिकोची जपानी संसदेच्या सभागृहात नियुक्ती झाली. ती 18 वर्षे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षात राहिली. आपल्या राजकीय कारकिर्दीत योशिकोने चीन आणि आशियाई देशांशी संबंध सुधारण्याचे काम केले.

युद्धात वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या महिलांना मिळवून दिली भरपाई
दुसऱ्या महायुद्धात जपानी लोकांनी केलेल्या अत्याचारांबद्दल उघडपणे बोलणारी योशिको हा पहिली जपानी नागरिक आणि नेता होती. युद्धादरम्यान जपानी सैनिकांनी अनेक महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले होते. या पीडित महिलांना भरपाई मिळावी यासाठी तिने मोहीम सुरू केली. अशा महिलांना युद्धाच्या काळात 'कम्फर्ट वुमन' म्हटले जायचे. जपानचे लोक अजूनही या मुद्द्यावर माफी मागण्यास टाळाटाळ करतात.

कम्फर्ट वूमन कोण होत्या?
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपानी सैन्याचे वर्चस्व होते, अशा परिस्थितीत कोरिया, चीन, फिलीपिन्स अशा अनेक देशांतील महिलांना बंदी बनवून ठेवले गेले होते आणि त्या सैनिकांसाठी सेक्स स्लेवरी केली जात होती. युद्धादरम्यान सुमारे 4 लाख महिलांना कम्फर्ट वूमन म्हणून ठेवण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख महिला चिनी होत्या. तर, युद्धादरम्यान प्रत्यक्ष वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची संख्या केवळ 1 लाख होती.

सैनिकांच्या मनोरंजनासाठी आणि युद्धकाळातील बलात्कार रोखण्यासाठी काही वेश्या महिलांना सैनिकांच्या छावण्यांमध्ये ठेवण्यात आले होते, ज्यांना कम्फर्ट स्टेशन्स असे म्हणतात, पण जपानी सैन्याने त्या देशांवर कब्जा सुरू करताच त्या देशांतील महिलांना सैनिकांनी ताब्यात घेतले. बळजबरीने अटक करण्यास सुरुवात केली.

युद्धानंतर ब-याच वर्षांनी 2 कोरियन मुली आणि महिलांची सुटका करण्यात आली होती. यातील बहुतांश महिलांना नोकरीच्या बहाण्याने बंदी बनवून आणण्यात आले होते, तर अनेकजणी उपासमारीमुळे अन्नाच्या बदल्यात लैंगिक गुलामगिरी करण्यास तयार झालेल्या होत्या. अनेक बर्मी महिलांनी कम्फर्ट वूमन बनवण्याच्या भीतीने सायनाइड पिऊन आत्महत्या केली होती. 1945 नंतर अशी अनेक प्रकरणे समोर आली जेव्हा सैनिकांनी कम्फर्ट वूमनला आत्महत्या करण्यास भाग पाडले. ज्या स्त्रिया गर्भवती झाल्या किंवा गंभीर आजारी पडल्या त्यांना मरणासाठी एकटे सोडले गेले होते.

जपानच्या पंतप्रधानांना मागावी लागली होती कम्फर्ट वूमनची माफी
1992 मध्ये, योशिको यामागुचीच्या कार्यकाळात, जपानचे तत्कालीन पंतप्रधान किची मियाजावा यांनी एक प्रेस नोट जारी केली होती. त्यात ते म्हणाले होते, मी मनापासून कम्फर्ट वूमनची माफी मागतो. त्यांनी जे भोगले ते कल्पनेपलीकडचे आहे. हा मुद्दा काही काळापूर्वी उपस्थित करण्यात आला आहे, असे मुद्दे हृदय पिळवटून टाकणारे आहेत, ज्याची मला खूप लाज वाटते, असे त्यांनी म्हटले होते.

सरकारच्या माफीनामानंतरही, योशिको यामागुचीने जनजागृतीसाठी मोहीम सुरूच ठेवली, तसेच आशियाई महिला निधीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. 2015 मध्ये माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी कम्फर्ट वूमन समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोरियासोबत करार केला होता.

एका मुलाखतीत योशिको म्हणाली होती - माझ्या मते, ज्या महिलांना कंफर्ट वुमन म्हटले जाते त्यांनी ज्या वेदना आणि अपमानाचा सामना केला, तो आजच्या पिढीच्या आकलनापलीकडचा आहे. त्यांचे अनुभव अवघड वाटत असले तरी वास्तवाला सामोरे जाणे महत्त्वाचे आहे.

योशिको यामागुचीचे 7 सप्टेंबर 2014 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. 2001 मध्येच तिचे पती हिरोशी ओटाका यांचे निधन झाले होते. योशिकोच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी एक प्रेस नोट जारी करून तिच्या मृत्यूची घोषणा केली होती. जपानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता.

बातम्या आणखी आहेत...