आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगारी पती, प्रियकरामुळे कंटाळली होती रुआन लिंग्यू:निधनानंतर एवढे चाहते जमले की पार्थिव 8 दिवसे रुग्णालयात ठेवावे लागले

इफत कुरेशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

GOSSIP IS A FEARFUL THING. गॉसिप ही एक भयानक गोष्ट आहे ...

ही ओळ रुआन लिंग्यू हिने तिच्या सुसाइड नोटमध्ये लिहिली होती. 1930 च्या दशकातील चीनमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री राहिलेली रुआन लिंग्यू तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या गॉसिप्समुळे एवढी अस्वस्थ झाली की तिने मरण पत्कारले. आपल्या सुसाइड नोटमध्ये तिने याचा उल्लेख देखील केला.

रुआनने वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी आत्महत्या केली होती. एवढ्या कमी वयात ती इतकी यशस्वी अभिनेत्री बनली होती की, तिच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर डझनभर चाहत्यांनीही जीव दिला होता. हॉस्पिटलबाहेर चाहत्यांच्या गर्दीमुळे तिचा मृतदेह 8 दिवस तिथेच ठेवावा लागला होता. तिची अंत्ययात्रा निघाली तेव्हा त्यात 3 लाख लोक सहभागी झाले होते. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने त्या दिवशी मथळ्यांमध्ये लिहिले होते - फ्युनरल ऑफ द सेंच्युरी.

रुआन लिंग्यूचे छोटेसे आयुष्य मोठ्या संघर्षातून गेले. वडिलांचे लहानपणी निधन झाले, आई दुसऱ्यांच्या घरात काम करून गुजराण करायची. लग्न झाल्यावर नवरा जुगारी निघाला. त्यालाही सोडावे लागले. ती दुसर्‍याच्या प्रेमात पडली पण त्या नात्यातही वेदनाच मिळाल्या. अभिनयात ती कुशल होती आणि लोक तिच्या अभिनयाचे दीवाने होते.

आज न ऐकलेल्या किश्यांमध्ये आपण जाणून घेऊया चीनची आयकॉनिक अभिनेत्री रुआन लिंग्यू हिच्याबद्दल... वैयक्तिक आयुष्यावर प्रकाशित झालेल्या बातम्या तिच्यासाठी जीवघेण्या ठरल्या.

वडिलांचे लहानपणी निधन झाले, आई मोलकरीण होती

रुआन लिंग्यू हिचा जन्म 26 एप्रिल 1910 रोजी शांघाय (चीन) येथे झाला. तिच्या जन्मानंतर थोड्याच दिवसांत तिच्या मोठ्या बहिणीचे निधन झाले. हा तो काळ होता जेव्हा चीनची परिस्थिती बिकट होत चालली होती. चीनवर 250 वर्षे राज्य करणारे किंग राजवंश संपुष्टात आले होते आणि सरकार स्थापन होत होते. रुआनची आई गृहिणी होती आणि वडील पेट्रोलियम कंपनीत एक कर्मचारी होते. एके दिवशी कंपनीत काम करत असताना रुआनच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला, त्यावेळी ती फक्त 6 वर्षांची होती.

रुआनच्या आईने घर आणि एकुलत्या एक मुलीची जबाबदारी उचलली आणि घरोघरी कामाला सुरुवात केली. जेव्हा आईने रुआनला शाळेत पाठवले तेव्हा तिने तिला तिची आई मोलकरीण असल्याचे कोणालाही सांगू नको असे सांगितले. रुआनची थट्टा होईल अशी भीती आईला होती.

वृत्तपत्रातील जाहिरात पाहून 15 वर्षांच्या रुआनने हिरोईन बनण्याचा निर्णय घेतला
1895 मध्ये चीनमध्ये मोशन पिक्चर्सची सुरुवात झाली आणि 1905 मध्ये येथे चित्रपट बनण्यास सुरुवात झाली. मूकपटांचे युग चालू होते. चीनची मिंगझिंग ही नवीन फिल्म कंपनी होती जिला कलाकारांची गरज होती. 1926 मध्ये कंपनीने नायिकेच्या शोधात वर्तमानपत्रात जाहिरात दिली. त्रासाला कंटाळून रुआनने वर्तमानपत्र वाचताच स्टुडिओ गाठला आणि तिची निवड झाली.

रुआन 1930 मध्ये चीनची स्टार बनली
पहिल्या चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर 1928 मध्ये रुआन लिंग्यूला 6 मोठे चित्रपट मिळाले. रुआनला 'स्प्रिंग ड्रीम इन द ओल्ड कॅपिटल' (1930) या चित्रपटाद्वारे लोकप्रियता मिळाली. हा चीनमधील सुरुवातीच्या यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटांमध्ये आल्यानंतर रुआन फँगेन, रुआन लिंग्यू बनली. त्याच वर्षी, रुआनने नवीन प्रोडक्शन हाऊस लिआनहुआ स्टुडिओशी करार करून मोठी जोखीम पत्करली. या प्रोडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपटात रुआनने यानयान नावाच्या वेश्येची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे रुआन या प्रोडक्सन हाऊससह संपूर्ण चीनची स्टार बनली.

दुसरी सर्वात यशस्वी अभिनेत्री, मुव्ही क्वीनचा दर्जा

रुआन लिंग्यू 1931 मध्ये 'लव्ह अँड ड्यूटी' सारखे चित्रपट करून एक स्टार म्हणून उदयास आली. 1933 - द स्टार डेली मॅगझिनने देशातील पहिले सार्वजनिक सर्वेक्षण केले. चीनच्या लोकांनी मतदान केलेली ती दुसरी मुव्ही क्वीन ठरली. हु डाय पहिल्या क्रमांकावर तर चेन युमी तिसऱ्या क्रमांकावर होता. थ्री मॉडर्न वुमन (1932) सह, रुआनने डाव्या चिनी दिग्दर्शकांसोबत काम करण्यास सुरुवात केली. 1934 मध्ये रिलीज झालेला 'द गॉडेस' हा रुआनच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो, ज्यामध्ये तिने एका विधवेची भूमिका केली होती जी मुलाच्या पालनपोषणासाठी वेश्याव्यवसायात पाऊल ठेवते.

जुगारीशी लग्न आणि नंतर प्लेबॉय बिझनेस टायकूनशी संबंध
रुआनची आई जिथे काम करत होती त्या श्रीमंत घरातील चौथा मुलगा झांग दामिन याच्या प्रेमात ती पडली होती. झांग हा जुगारी होता, त्याला घराबाहेर काढण्यात आले होते. रुआन ही एक स्टार होती जिने झांगचा जुगाराचा छंदही स्वखर्चाने सांभाळला होता. दोघांनीही लग्न केले आणि एक मुलगी नन्ननला दत्तक घेतले. रुआन झांगच्या वाढत्या बिघडत चाललेल्या वृत्तीने त्याच्यापासून वेगळे झाली. झांगला सोडल्यानंतर, रुआन बिझनेस टायकून टँग झिशान याच्या प्रेमात पडली. तो त्याच्या प्लेबॉय स्वभावामुळे कुप्रसिद्ध होता.

कायदेशीर लढा
1934 मध्ये, रुआन आणि टँग यांच्या नात्यामुळे संतापलेल्या झांगने त्यांच्याविरोधात खटला भरला. विवाहित असूनही रुआनचे टँगसोबत अफेअर असल्याचा आरोप तसेच रुआनवर चोरीचा आरोप केला. पुढच्या वर्षी झांगने पुन्हा रुआनवर गंभीर आरोप केले आणि तिला न्यायालयात खेचले. या काळात रुआन तिचा बॉयफ्रेंड टँगसोबत राहत होती, पण त्याचवेळी टँगचे आणखी एक अभिनेत्री लियांग सैझेनसोबत अफेअर सुरु होते.

रुआनचे खासगी आयुष्य वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले
न्यायालयीन प्रकरणामुळे रुआनचे खासगी आयुष्य गॉसिप्सचा विषय बनले होते. तिचा पती रोजच्या मुलाखतींमध्ये रुआनच्या विरोधात बोलत असे आणि वैयक्तिक गोष्टी शेअर करत असे. वर्तमानपत्रातील बहुतेक बातम्या तिच्या अफेअर आणि वादग्रस्त आयुष्य म्हणून प्रसिद्ध होऊ लागल्या. वाद आणि गॉसिप्सचा रुआनवर खोलवर परिणाम झाला.

मृत्यूपूर्वी आत्महत्येचे दृश्य शूट केले होते
1935 मध्ये रिलीज झालेला रुआनचा 'न्यू वुमन' हा चित्रपट खूप चर्चेत होता. हा तिचा दुसरा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट रुआनच्या जीवनावर आधारित असल्याचा दावा बर्‍याच लोकांनी केला होता, कारण ज्या अभिनेत्रीवर हा चित्रपट बनला होता त्या अभिनेत्रीने देखील गॉसिप्समुळे परेशान होऊन मृत्यूला कवटाळले होते. तिचे नाव आय झिया असे होते.

या चित्रपटातील मृत्यूच्या दृश्याचा रुआनवर वाईट परिणाम झाला. मृत्यूचा सीन शूट करताना रुआनने दिलेले एक्सप्रेशन्स पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. झोपेच्या गोळ्या खाऊन रुआन स्वतःला मारत आहे असे सर्वांना वाटले.

रुआनने यापूर्वीही मरण्याचा प्रयत्न केला होता
शूट संपताच रुआन खूप रडली, सेटवर शांत वातावरण होते, जणू कोणीतरी आत्महत्या केली आहे. सेटवर को-स्टार ली लिलीही उपस्थित होती. तिने रुआनला विचारले की, हा सीन शूट करताना तू काय विचार करत होतीस. रुआन म्हणाली, माझे आयुष्य असेच आहे, फरक एवढाच आहे की मी जिवंत आहे. मी याआधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तेव्हा माझ्या मनात आलेले तेच विचार मी पुन्हा पुन्हा करत होतो. तो एक सेकंद तुम्हाला खूप गोंधळात टाकतो. कधी कधी असं वाटतं की तुम्ही स्वतःला आयुष्यातील सर्व दुःखातून मुक्त करत आहात तर कधी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही स्वतःलाच त्रास देत आहात. अनेक लोकांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर येत होते, काही ज्यांच्यावर मी प्रेम केले, काहींचा मी तिरस्कार केला.

24व्या वर्षी मृत्यूला कवटाळण्यापूर्वी लिहिले - गॉसिप ही खूप भीतीदायक गोष्ट आहे

7 मार्च 1935. रुआनला खटल्याच्या सुनावणीसाठी 8 मार्च रोजी न्यायालयात हजर राहायचे होते. मात्र तसे झाले नाही. रात्रीच्या जेवणासोबत रुआनने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. ती तडफडत होती, घरात उपस्थित लोकांनी तिला सिनो फॉरेन हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे तिचा मृत्यू झाला.

8 मार्च रोजी, चीनची गॉडेस आणि मुव्ही क्वीन रुआनने वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. त्यावेळी तिचा प्रियकर घरात उपस्थित होता, त्याच्याकडे सुसाइड नोट सापडली होती. त्यात लिहिले होते - गॉसिप ही खूप भीतीदायक गोष्ट आहे.

जेव्हा मी मरेन तेव्हा लोकांना वाटेल की मी हे लाजेमुळे हे कृत्य केले, पण माझा असा काय गुन्हा आहे ज्याने मला लाज वाटावी. मी झांग दामिन (माजी पती) सोबत कधीही काहीही चुकीचे केले नाही. आम्ही वेगळे झालो तेव्हा पुढच्या महिन्यापासून मी त्याला 100 युआन (चिनी चलन) दिले.

मला ते उघड करायचे नव्हते. माझ्याकडे याचे पुरावे आणि सर्व पावत्या आहेत, परंतु त्याने माझ्या उपकाराचा त्याने सूड उगवला. हे बाहेरच्या जगाला माहीत नाही. त्याने लोकांना पटवून दिले की मी चुकीचे केले आहे.

मग आता मी काय करू शकते? मी खूप विचार केला, पण आता फक्त आत्महत्याच हे थांबवू शकते.

माझी विश्वास आहे की, मी मेल्यावर कुणालाही पश्चात्ताप होणार नाही, परंतु गॉसिप ही एक भयानक गोष्ट आहे. मला अजूनही भीती वाटते की लोक काय बोलतील.

मी मेल्याशिवाय माझे निर्दोषत्व सिद्ध करू शकत नाही. आता मी मरत असल्याने त्याला त्याचा मार्ग मिळेल. त्याने मला स्वतः मारले नसले तरी मी त्याच्यामुळे मरत आहे. आता यातून झांग दामिन कसा बाहेर पडेल ते बघू. तू मला मृत्यूला कवटाळण्यास भाग पाडले, आता तू टँग झिशानला अडकवू शकतोस.

- रुआन लिंग्यूचे शेवटचे शब्द, 7 मार्च 1935

प्रियकराने मृत्यूनंतर खोटी सुसाइड नोट लिहिली

रुआनच्या मृत्यूनंतर अनेक वृत्तपत्रांमध्ये दोन सुसाइड नोट्स प्रकाशित झाल्या. एक ते जे तुम्ही वर वाचले आणि दुसरे रुआनच्या बॉयफ्रेंड टँगने प्रकाशित केले होते. दुसरी सुसाइड नोट बनावट असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. खरं तर, दुसरी सुसाइड नोट प्रकाशित करणार्‍या प्रकाशनाच्या संपादकाने असा दावा केला की, ही चिठ्ठी रुआनचा प्रियकर टँग झिशान याने त्याच्या गर्लफ्रेंडच्या बहिणीकडून लिहून घेतली होती, तिचे हस्ताक्षर रुआनशी मिळते-जुळते होते. ती चिठ्ठी बनावट होती आणि त्यात रुआनने टँगगची माफी मागितल्याचा उल्लेख होता.

खरी सुसाईड नोट सापडल्याने धक्कादायक खुलासा झाला

बनावट सुसाइड नोट समोर आल्यानंतर काही काळातच तपासात रुआनने टँग झिशानला लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत रुआनने खुलासा केला होता की, टँग तिच्यावर अत्याचार करत असे. रुआनने लिहिले होते की, जर टँगने तिच्या मृत्यूच्या रात्री तिला मारहाण केली नसती तर कदाचित ती जिवंत असती. पुढे वाचा ती सुसाइड नोट -

  • रुहानची दुसरी खरी सुसाइड नोट...

झिशान,

जर तू त्या पब्लिकेशनसोबत हातमिळवणी केली नसता किंवा त्या संध्याकाळी तू मला मारले नसते तर आज मी जिवंत असते. माझ्या मृत्यूनंतर लोक तुला सैतान आणि प्लेबॉय म्हणतील. त्याहीपेक्षा लोक मला निर्जीव स्त्री म्हणतील, पण तोपर्यंत मी या जगातून निघून गेलेली असेल. तुझ्या एकटाच छळ होत राहील.

झियुन (टँग झिशानची एक्स गर्लफ्रेंड) ला कळून चुकले होते की, टँग पुढे काय होणार आहे. मी मेल्यावर तुझा द्वेष करण्याची हिम्मत करणार नाही. आशा आहे की तू माझी आई आणि नन्नन (दत्तक मुलगी) यांची काळजी घेशील.

मला लिआनहुआकडून 2050 युआन (चिनी चलन) घ्यायचे आहे. कृपया त्या पैशाने आईची काळजी घे. आता ते फक्त तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. माझ्याशिवाय तुला पाहिजे ते कर. मी खूप आनंदी आहे.

- रुआन लिंग्यू, 7 मार्च 1935

चाहत्यांची गर्दी एवढी होती की आठवडाभर अंत्यसंस्कार होऊ शकले नव्हते
रुआन लिंग्यू हिचे पार्थिव वांग्यो फ्युनरल होममध्ये ठेवण्यात आले होते. प्रेक्षकांची गर्दी एवढी होती की सुमारे 8 दिवस तिच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले नव्हते.

3 लाख लोकांनी घेतले होते अंत्यदर्शन
14 मार्च 1935. सुमारे 3 लाख लोक रुआन लिंग्यूचे अंत्यदर्शन पोहोचले होते. ही गर्दी 4.8 किलोमीटरपर्यंत होती. रुआनच्या आत्महत्येनंतर तिच्या अनेक चाहत्यांनी आत्महत्या केली होती. न्यूयॉर्क टाइम्सने याला शतकातील सर्वात मोठा अंत्यसंस्कार म्हटले आहे.

रुआनच्या मृत्यूनंतर चाळीस वर्षांनंतर, चित्रपट इतिहासकार जे लेडा यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक शॅडो: अॅन अकाउंट ऑफ फिल्म या पुस्तकात रुआनच्या दुःखद जीवनाचे वर्णन केले.

ती 1930 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री होती, जिच्या आयुष्यावर बराच अभ्यास करण्यात आला. तिच्या आयुष्यावर दोन टीव्ही सिरीज बनला. दिग्दर्शक स्टेनली क्वान यांनी 1991 मध्ये रुआन लिंग्यूवर बायोपिक बनवला होता.

बातम्या आणखी आहेत...