आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीझर बघाच!:चिरंजीवी आणि रामचरण या बापलेकाच्या 'आचार्य'चा दमदार टीझर रिलीज, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय चित्रपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट यावर्षी 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा रामचरण तेजा या बापलेकाच्या आगामी 'आचार्य' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीझरची चर्चा सुरू झाली आहे.

या टीझरमध्ये चिरंजीवी दमदार भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात चिरंजीवी काही अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. चित्रपटात चिरंजीवी आणि रामचरणसह अभिनेत्री काजल अग्रवाल हिचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे.

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा कोरताल शिव यांनी सांभाळली असून निर्मिती रामचरण आणि निरंजन रेड्डी यांनी केली आहे. हा चित्रपट यावर्षी 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. एकंदरीतच या बापलेकाच्या जोडीला पडद्यावर एकत्र बघण्यासाठी चाहते मंडळी आतूर झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...