आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा यांच्या पार्थिवावर सोमवारी बंगळूरु येथील कनकपुरा स्थित त्यांच्या फार्महाऊसवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये त्यांची पत्नी मेघना त्यांना अखेरचा निरोप देताना दिसत आहे. चिरंजीवी यांना अखेरचा निरोप देताना पत्नी मेघनाच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यांचा मन हेलावून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थित सगळेच सून्न झाले होते. यावेळी उपस्थितांनी त्यांना सांभाळले.
दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
चिरंजीवी यांचे 2 मे 2018 रोजी कन्नड अभिनेत्री मेघना राजसोबत लग्न झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. तसेच मेघना आता गरोदर असल्याचे समोर आले आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार चिरंजीवी यांची पत्नी मेघना गर्भवती आहे. तसेच ते दोघेही आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माची वाट पाहात होते. पण त्या दोघांनीही या बाबात कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती.
View this post on InstagramThank u soo much @megsraj with u life is soo beautiful...Love u
A post shared by Chirranjeevi Sarja (@chirusarja) on Oct 18, 2019 at 1:02pm PDT
अनेक कलाकारांनी दिला अखेरचा निरोप
चिरंजीवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार पोहोचले होते. कन्नड अभिनेता यश, शिवा राजकुमार आणि किच्चा सुदीप यांनी त्यांना अलविदा केले. सोबतच चाहत्यांनीही आपल्या लाडक्या कलाकाराला अखेरचा निरोप द्यायला मोठी गर्दी केली होती.
रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने झाले होते निधन
रिपोर्ट्सनुसार, शनिवारी चिरंजीवी यांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला होता. याविषयी त्यांनी डॉक्टरांशी चर्चाही केली होती. दुस-या दिवशी रविवारी 1 वाजताच्या सुमारास ते आपल्या वडिलांशी फोनवर बोलत होते, तेव्हा ते अचानक कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
22 चित्रपटांमध्ये केला अभिनय
चिरंजीवी यांनी 2009 मध्ये वायूपूत्र या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच त्यांनी अम्मा आय लव्ह यू, राम लीला, चंद्रलेखा, चिरु या चित्रपटांसह एकुण 22 कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे.12 मार्च रोजी प्रदर्शित झालेला शिवार्जुन हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला आहे. त्यांचे आजोबा शक्ती प्रसाद आणि काका अर्जुन सरजा हे देखील चित्रपट कलाकार आहेत. त्यांचे भाऊ ध्रुव सरजा हेदेखील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.