आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाक्षिणात्य सुपरस्टारला कोरोनाची लागण:शूटिंग सुरु करण्यापूर्वी केलेली कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली, दोन दिवसांपूर्वीच मास्क न घालता तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिरंजीवी यांच्या ट्विटनंतर त्यांचे चाहते त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. सोशल मीडियावरदेखील #Chiranjeevi ट्रेंड करत आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. 65 वर्षीय चिरंजीवी यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी ट्विटरवर एक ट्विट केले.

चिरंजीवी यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले, "मला सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीयेत आणि मी आता होम क्वारंटाइन आहे. मागील 4 ते 5 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया कोविड चाचणी करुन घ्यावी ही विनंती. मी माझ्या आरोग्याबद्दलचे अपडेट देत राहिल,'' अशी पोस्ट त्यांनी टाकली आहे.

शूटिंगपूर्वी कोरोना चाचणी घेण्यात आली होती
चिरंजीवी लवकरच त्यांच्या आगामी आचार्य या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार होते, सेटवर जाण्यापूर्वी त्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करुन घेतली ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे मार्चमध्ये 'आचार्य'चे शूटिंग थांबविण्यात आले होते. या चित्रपटात चिरंजीवी व्यतिरिक्त काजल अग्रवालसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचा निर्माता चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण आहे तर दिग्दर्शन कोराताला शिव करत आहेत.

मुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट

चिरंजीवी यांनी 7 नोव्हेंबरला हैदराबादच्या प्रगती मैदानावर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मास्क घातला नव्हता. चिरंजीवी व्यतिरिक्त दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनही यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...