आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फसवणुकीचे प्रकरण:पैशांची फसवणूक केल्याप्रकरणी कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नी विरोधात गाझियाबादमध्ये गुन्हा दाखल, हे आहे संपूर्ण प्रकरण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2013 मध्ये रेमो डिसूझाने ‘अमर मस्ट डाय’ या नावाचा चित्रपट बनवला होता.
  • या चित्रपटासाठी रेमोने 5 कोटी रुपये उधारीवर घेतले होते.

बॉलिवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा आणि त्यांची पत्नी लीझल यांच्यावर गाझियाबाद येथे राहणाऱ्या सत्येंद्र त्यागी यांनी फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे. याप्रकरणी गाझियाबादच्या सिहानी गेट पोलिसांनी आरोपपत्र सादर केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रेमो विरोधात तक्रार दाखल करणारे सत्येंद्र त्यागी यांनी 2016मध्ये गाझियाबादच्या सिहानी गेट पोलिस स्थानकात रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लीझल यांच्याविरूद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी समन्स बजावल्यानंतरही रेमो आणि त्यांची पत्नी लीझल हजर झाले नाहीत. त्यानंतर रेमोविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते. परंतु, रेमोने हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन घेतला होता.

पैसे दुप्पट करुन देणार असल्याचे सांगितले होते

सत्येंद्र त्यागी हे मोरेटा येथील रहिवासी आहेत. त्यांनी सांगितले की, 2013 मध्ये रेमो डिसूझाने ‘अमर मस्ट डाय’ या नावाचा चित्रपट बनवला होता. या चित्रपटासाठी रेमोने त्यांच्याकडून 5 कोटी रुपये उधारीवर घेतले होते. शिवाय एका वर्षात याच्या दुप्पट पैसे परत करण्याचे वचन दिले होते. मात्र, ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे रेमोने सत्येंद्र यांना पैसे परत केले नाहीत. म्हणूनच त्यांनी गाझियाबादच्या सिहानी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

त्यागी यांचे वकील मोहनीश जयंत यांनी या संदर्भात माध्यमांशी संवाद साधला सांगितले की, कोरिओग्राफर रेमो आणि सतेंद्र त्यागी या दोघांची चांगली मैत्री होती. रेमोच्या सल्ल्यानुसार सतेंद्र त्यागी यांनी सात वर्षांपूर्वी सुमारे पाच कोटी रुपये रेमोला चित्रपटात गुंतवण्यासाठी दिले होते. परंतु नंतर रेमोने फसवणूक करून त्यांना पैसे परत देण्यास नकार दिला. या प्रकारानंतर सत्येंद्र यांनी रेमो विरोधात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशानुसार रेमो डिसूझा विरोधात सिहानी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी रेमो डिसूझा आणि त्यांच्या पत्नीला आरोपी ठरवून सदर आरोपपत्र दाखल केले आहे.

रेमोच्या ‘अमर मस्ट डाय’ या चित्रपटात राजीव खंडेलवाल आणि जरीन खान झळकले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता.