आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:नृत्यदिग्दर्शक श्यामक दावर यांची आई पूरन दावर यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन, बॉलिवूड सेलेब्रिटींनी व्यक्त केला शोक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयाच्या 99 वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बॉलिवूडचे लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक श्यामक दावर यांच्या मातोश्री पूरन दावर यांचे 23 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले. वयाच्या 99 वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही वर्षांपासून त्या आजारी होत्या. श्यामक यांच्या आईच्या निधनाच्या बातमीनंतर अनेक बॉलिवूड सेलेब्सनी शोक व्यक्त केला आहे.

बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानी यांनी गुरुवारी पूरन दावर यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली. त्यांनी लिहिले, 'श्यामक दावर यांच्या मातोश्री पूरन एन दावर यांचे आज सकाळी निधन झाले. त्या 99 वर्षांच्या होत्या. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.'

विरल यांची ही पोस्ट समोर आल्यानंतर इंडस्ट्रीतील लोकांनी आणि चाहत्यांनी श्यामक दावर आणि त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे. दिया मिर्झाने इमोजी शेअर केले, तर रश्मी देसाईने दुःख व्यक्त करत लिहिले, 'ओम शांती.'

59 वर्षीय श्यामक दावर हे इंडस्ट्रीमधील सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरपैकी एक आहेत. त्यांनी ताल, किसना, बंटी और बबली, धूम 2, आय सी यू, तारे जमीं पर, युवराज, रब ने बना दी जोडी, भाग मिल्खा भाग आणि जग्गा जासूस अशा अनेक चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. 1998 मध्ये श्यामक यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

बातम्या आणखी आहेत...