आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Chris Hemsworth Praises Randeep Hooda, Says If There Was No Partner Like That, Then The Fighting Sequence Would Not Have Been So Special.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक्सट्रॅक्शन:क्रिस हेम्सवर्थने केले रणदीप हूडाचे कौतुक, म्हणाला - त्याच्यासारखा पार्टनर नसता तर हे दृश्य इतके विशेष झाले नसते 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका मुलाखतीत क्रिस हेम्सवर्थ आणि दिग्दर्शक सॅम हार्ग्रेव यांनी रणदीपचे कौतुक केले.

क्रिस हेम्सवर्थची प्रमुख भूमिका असलेला 'एक्सट्रॅक्शन' हा  नेटफ्लिक्सचा चित्रपट येत्या 24 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. शूटिंग लोकेशनच्या बाबतीत हा हॉलिवूड चित्रपट भारतीय प्रेक्षकांसाठी खूप खास आहे. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग मुंबई आणि अहमदाबादमध्ये झाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हूडा हॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. एका मुलाखतीत क्रिस आणि दिग्दर्शक सॅम हार्ग्रेवने रणदीपचे कौतुक केले.

  • क्रिस आणि रणदीपचा 12 मिनिटांचा फाइटिंग सिक्वेन्स आहे खास

रणदीप आणि क्रिसचा 12 मिनिटांचा फाइटिंग सिक्वेन्स 'एक्सट्रॅक्शन' चित्रपटात शूट झाला आहे. मुलाखतीदरम्यान क्रिस म्हणाला की, जर रणदीपसारखा पार्टनर नसता तर हे दृश्य इतके विशेष झाले नसते. अभिनेता म्हणाला की, हा आतापर्यंतचा सर्वात थकवणारा अ‍ॅक्शन सिक्वेन्स होता.

त्याने पुढे सांगितले की, सॅमने स्वत: गाडीसमोर उभे राहून सीन शूट केला. यासाठी आमच्या दोघांचीही खूप तालीम झाली. त्याच वेळी, दिग्दर्शक सॅम हार्ग्रेवने यांनी सांगितले की, आमचा हेतू प्रेक्षकांना रिअल टाइम अनुभूती देण्याचा होता. म्हणून आम्ही सिक्वेन्स अशा प्रकारे शूट केला. क्रिस आणि रणदीपच्या दृष्टीकोनातून प्रेक्षकांनी सर्व काही पाहावे अशी आमची इच्छा होती.

  • भारतीय सह-कलाकारांची स्तुती केली

यापूर्वीही क्रिसने रणदीप हूडा आणि रुद्राक्ष जयस्वाल यांचे कौतुक केले आहे. तो म्हणाले की, आम्ही आपापसांत भांडत तीन आठवडे एकत्र घालवले आणि आपल्या वाट्याला आलेल्या जखमाही सहन केल्या. रणदीपसोबत काम करण्याचा अनुभव खूप खास होता.

क्रिसने रुद्राक्षच्या अभिनयाचेही जोरदार कौतुक केले. तो म्हणाले, रुद्राक्षच्या अभिनयाने मला आश्चर्यचकित केले आहे, आम्हीसुद्धा त्याचा अभिनय पाहून रडू लागलो. त्याची कारकीर्द खूप चांगली असणार आहे. त्याने सांगितले की, ज्याप्रमाणे रुद्राक्षला दिग्दर्शकाचे शब्द समजतात, ते एखाद्या मोठ्या कलाकारदेखील समजू शकत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...