आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्‍सट्रॅक्‍शन:24 एप्रिलला रिलीज होणार क्रिस हेम्सवर्थचा चित्रपट,  महत्त्वाच्या भूमिकेत आहेत रणदीप हूडा आणि पंकज त्रिपाठी  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रिस मार्चमध्ये या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार होता.

भारतात शूट झालेल्या नेटफ्लिक्सच्या 'एक्सट्रॅक्शन' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत सगळेजण आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार्‍या सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थने व्हिडिओ मेसेजद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. विशेष बाब म्हणजे क्रिस मार्चमध्ये या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार होता, परंतु कोरोना साथीच्या संकटामुळे ही भेट रद्द झाली आहे. 

  • नमस्ते इंडियापासून सुरुवात

क्रिसने नमस्ते इंडिया असे म्हणत मेसेजची सुरुवात केली. तो म्हणाला, 'आपल्या सर्वांना माहितच आहे की, मी भारतात येऊन हा चित्रपटाचा आनंद साजरा करण्यासाठी खूप उत्साही होतो. चित्रपट निर्मितीच्या वेळी तुमच्या देशात घालवलेला वेळ मी विसरु शकत नाही.'

तो पुढे म्हणाला, 'सध्या जगात काय चालले आहे हे आपणा सर्वांना माहित आहे आणि मी तुमच्यासारखा घरी आहे.' यासह क्रिसने 'एक्सट्रॅक्शन'मध्ये काम करणा-या बॉलिवूड स्टार्सचेही कौतुक केले. 'एक्सट्रॅक्शन'मध्ये रणदीप हूडा, पंकज त्रिपाठी, मनोज बाजपेयी देखील महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. 24 एप्रिल रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असल्याचे अभिनेत्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...