आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:महाराष्ट्रात येत्या 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु होणार, राज्य सरकारचा निर्णय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • आज रोहित शेट्टीसह अनेक निर्मात्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर आता राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केलीय. त्यानुसार राज्यातील शाळा आणि मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळ सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यापाठोपाठ आता राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु होणार आहेत. येत्या 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु होणार आहेत.

पेन स्टुडिओचे अध्यक्ष आणि एमडी डॉ. जयंतीलाल गडा आणि दिग्दर्शक -निर्माता रोहित शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली. महाराष्ट्रातील चित्रपटगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.

या बैठकीला टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होणार
कोरोनाने गेले दीड वर्ष बंद असलेली राज्यातील शाळांची घंटा आता खणखणणार आहे. राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली असून ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी, तर शहरांमध्ये 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू हाेतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिली.

धार्मिक स्थळी मास्क, सुरक्षित अंतर आदी नियमांचे पालन करावे लागणार
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे दर्शनासाठी आरोग्याचे नियम पाळून खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ते म्हणाले, संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे नियोजन केले आहे, मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली करताना मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हे नियम पाळण्याची जबाबदारी त्या व्यवस्थापन समितीची असणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...