आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थिएटर्स मालक आणि बॉलिवूडकरांना मोठा दिलासा:उद्यापासून 50 टक्के आसनक्षमतेवर चित्रपटगृहांसोबत नाट्यगृहे सुरु होणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनलॉक संदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलींमध्ये ही परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 5 अंतर्गत गाइडलाइन्स जारी करुन 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली. मात्र महाराष्ट्रात आतापर्यंत चित्रपटगृहे बंद होती. पण आता सगळ्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण उद्यापासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहे सुरु होत आहे. सोबतच नाट्यगृहं सुरु करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद होती. मंगळवारीच चित्रपट समीक्षक कोमल नाहाटा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती.

राज्य सरकारने जारी केलेल्या नियमानुसार 50 टक्के क्षमतेने ही सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असेल. सोबतच थिएटर सुरू होणार असले तरी तिथे फूड कोर्ट आणि फूड स्टॉक करण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही.

त्यासोबतच कंटेन्मेंट झोन वगळता योगा क्लासेस, बॅडमिंटन, टेनिस खेळ सुरू करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. अनलॉक संदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलींमध्ये ही परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होत आहे. मात्र असे असले तरीही कोरोनाची दुसरी लाट पुन्हा येऊ शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे कोरोनाबाबत खबरदारी आगामी काळातही घ्यावी लागणार आहे.