आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाकाळात चित्रपटांचे चित्रीकरण आणि प्रदर्शन स्थगित होत असले तरी पटकथा लेखकांच्या कामात मोठी वाढ झाली आहे. एवढेच काय तर अनेक लेखकांचे काम दुप्पट झाले आहे. “हामिद’ व “पीपा’सारख्या चित्रपटांचे लेखक रविंदर रंधावा यांनी नुकताच अॅमेझॉनसाठी लिहिलेल्या कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू आहे. ते सांगतात की, आमच्यावर कोरोनाचा एवढा परिणाम झाला नाही. कंटेंटची मागणी वाढली आहे. मात्र काम होणे व पैसे भेटणे वेगळी गोष्ट आहे. पैसे उशिरा मिळतात, मात्र काम खूप आहे. एखादा लेखक वर्षभरात २० लाख रुपयांचे काम करत आहे. उत्पन्नाचे चक्र सुरू राहावे म्हणून आम्ही अनेक प्रकल्प करतोय.
वेबसीरीज गुल्लक- २ चे पटकथा लेखक दुर्गेशसिंह सांगतात की, कोरोनानंतर काम दुप्पट झाले आहे. त्यांनी नुकतेच रेड चिलीजसाठी शो लिहिणे सुरू केले आणि तो तयारही करत आहेत. ते पंचायतच्या दुसऱ्या हंगामाचे लेखन करत आहेत. आश्रम वेबसीरीजचे लेखक संजय मासूम म्हणतात की, चित्रपट व वेबसीरीज लेखनाचे काम पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. चित्रीकरण होत नव्हते मात्र निर्मितीचे काम जास्त वेगाने सुरू आहे. ते रक्तांचलच्या दुसऱ्या हंगामाचे लेखन करत आहेत. लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार स्वानंद किरकिरे म्हणतात की, ओटीटीमुळे लेखकांना काम मिळत आहे. त्यांच्याकडे रोजगार आहे मात्र चित्रपटांचे प्रदर्शन व्हावे व अडकलेला पैसा मिळावा, असे वाटते. ओटीटीवर चित्रपट बघण्याची सवय लोकांना लागू नये. दरम्यान, ‘सूर्यवंशी’चे निर्माते व नेटफ्लिक्स यांच्यात ओटीटी प्रदर्शनाची चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.
ओटीटीवर दुप्पट होईल ओरिजनल कंटेंटची मागणी
दृश्यम प्रॉडक्शन ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाँच करत आहे, त्याचे तीन प्रकल्प सुरू आहेत. नुकत्याच फिक्कीच्या माध्यम व मनोरंजावर आलेल्या अहवालानुसार २०२३ मध्ये ओटीटीवर ओरिजनल कंटेंटची मागणी दुप्पट होईल. २०२० मध्ये नेटफ्लिक्सवर नॉन फिक्शन कंटेंटमध्ये २५०, डाॅक्युमेंट्रीत १००, फिक्शनमध्ये ३७०, किड्स टायटलमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसली. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर सर्वाधिक चित्रपट बघणारा देश भारत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.