आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर स्टारर...:'सर्कस'च्या रिलीजची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल : रोहित शेट्टी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंगचा आगामी चित्रपट “सर्कस’ आहे, त्यात तो पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला आहे. आधी हा चित्रपट १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती, मात्र रोहितने सांगितले, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. रोहित म्हणाला, “आम्ही हा चित्रपट यावर्षी १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहोत, असे बोलले जात आहे.

मात्र आम्ही अद्याप रिलीजची तारीख शोधत आहोत आणि लवकरच अचूक तारीख जाहीर करण्यात येईल. रोहित पुढे म्हणाला, तो “आरआरआर” आणि “गंगुबाई काठियावाडी सारख्या चित्रपटांपूर्वी “सर्कस” चित्रपटगृहात प्रदर्शित करणार नाही. तो जुलै-ऑगस्ट नंतरच प्रदर्शित करेल.

बातम्या आणखी आहेत...