आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भाईजान'ला अडवणे महागात पडणार:सलमान खानला विमानतळावर रोखणारा ASI अडचणीत सापडला, CISF ने अधिकाऱ्यावर प्रोटोकॉल उल्लंघनाचा आरोप केला; मोबाईलही जप्त करण्यात आला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • CISF ने ASI वर प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप केला

अभिनेता सलमान खान नुकताच त्याच्या आगामी 'टायगर 3' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईहून रशियाला रवाना झाला. या दरम्यान मुंबई विमानतळावरून सलमानची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले होते, ज्यात सलमान खानला विमानतळावर सीआयएसएफच्या एका जवानाने चौकशीशिवाय आत जाण्यापासून रोखलेले दिसले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रत्येकाने या सीआयएसएफच्या जवानाचे कौतुक केले. या CISF जवानाचे नाव सोमनाथ मोहंती आहे. या घटनेनंतर सोमनाथ सोशल मीडियावर हीरो झाले होते. पण आता ताज्या वृत्तानुसार, सलमानला विमानतळावर रोखल्यानंतर सोमनाथ मात्र अडचणीत सापडले आहेत.

CISF ने ASI वर प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप केला
CISF अधिकारी सोमनाथ मोहंती यांनी सलमानला विमानतळावर थांबवून आपले कर्तव्य बजावले होते. पण आता सोमनाथ मोहंती यांच्यावर प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप झाला आहे. रिपोर्टनुसार, सोमनाथ मोहंती यांनी ओडिशा येथील एका मीडिया हाऊससोबत बातचीत केल्याने CISF ने त्यांचा मोबाइल जप्त केला आहे. मीडियाशी संवाद साधल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, कारण हे सीआयएसएफ प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे. सोमनाथ भविष्यात या घटनेबद्दल मीडियाशी बोलू नये म्हणून, CISF ने त्यांचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. सोमनाथ मोहंती हे मूळचे ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.

यूजर्सनी CISF अधिकाऱ्याचे केले होते कौतुक
सीआयएसएफ अधिकारी सोमनाथ मोहंती यांनी विमानतळावर सुरक्षा चौकशीसाठी सलमान खानला रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर, नेटक-यांनी CISF चे ASI सोमनाथ यांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते. अनेकांनी सोमनाथ यांना रिअल सुपरहिरो देखील म्हटले होते. त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, एका एका
यूजरने कमेंट करताना लिहिले होते, 'सीआयएसएफच्या जवानाने ज्या प्रकारे रोखले ते पाहून छान वाटले.'

सलमानचे अपकमिंग प्रोजेक्ट्स
'टायगर 3' या चित्रपटात सलमान खानसह कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे युरोपियन देशात 45 दिवसांचे शूटिंग शेड्युल आहे. चित्रपटात इम्रानची नकारात्मक भूमिका असेल. इम्रानच्या एन्ट्री सीनला धमाकेदार बनवण्यासाठी निर्मात्यांनी 10 कोटींपेक्षा जास्त खर्च केल्याचे वृत्त आहे. 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. याशिवाय सलमान जॅकलिन फर्नांडिससह 'किक 2', पूजा हेगडेसह 'कभी ईद कभी दिवाली' आणि आयुष शर्मासह 'अंतिम : द फायनल ट्रूथ' या चित्रपटातही झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...