आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भाईजान'ला रोखणा-या अधिकाऱ्याला मिळाले बक्षीस:ASI सोमनाथ मोहंती यांना मुंबई विमानतळावर कर्तव्य बजावल्याबद्दल मिळाले बक्षीस, CISF ने स्वतः दिली माहिती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता हे वृत्त निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे.

अभिनेता सलमान खान नुकताच त्याच्या आगामी 'टायगर 3' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईहून रशियाला रवाना झाला. या दरम्यान मुंबई विमानतळावरून सलमानची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले होते, ज्यात सलमान खानला विमानतळावर सीआयएसएफच्या एका जवानाने चौकशीशिवाय आत जाण्यापासून रोखलेले दिसले. या CISF जवानाचे नाव सोमनाथ मोहंती आहे. या घटनेनंतर सोमनाथ सोशल मीडियावर हीरो झाले होते. सोशल मीडियावर प्रत्येकाने या सीआयएसएफच्या जवानाचे कौतुक केले.

सलमानला विमानतळावर रोखल्याने सोमनाथ अडचणीत सापडल्याचे वृत्त आले होते. CISF ने मोहंती यांच्यावर प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. पण आता हे वृत्त निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे.

CISF ने आक्षेप घेतला

सीआयएसएफने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या प्रकरणात समोर आलेल्या चुकीच्या बातम्यांवर आक्षेप घेतला आणि लिहिले, 'या ट्विटमध्ये नमूद केलेला कंटेट चुकीची आहे आणि त्यात तथ्य नाही. खरं तर, या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्याला कर्तव्य बजावताना व्यावसायिकतादाखवल्याबद्दल योग्य बक्षीस देण्यात आले आहे.'

रिपोर्ट्समध्ये काय लिहिले होते?

रिपोर्टनुसार, सोमनाथ मोहंती यांनी ओडिशा येथील एका मीडिया हाऊससोबत बातचीत केल्याने CISF ने त्यांचा मोबाइल जप्त केल्याचे वृत्त आले होते. मीडियाशी संवाद साधल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. सोमनाथ मोहंती हे मूळचे ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.

यूजर्सनी CISF अधिकाऱ्याचे केले होते कौतुक
सीआयएसएफ अधिकारी सोमनाथ मोहंती यांनी विमानतळावर सुरक्षा चौकशीसाठी सलमान खानला रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर, नेटक-यांनी CISF चे ASI सोमनाथ यांनी त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते. अनेकांनी सोमनाथ यांना रिअल सुपरहिरो देखील म्हटले होते. त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, एका यूजरने कमेंट करताना लिहिले होते, 'सीआयएसएफच्या जवानाने ज्या प्रकारे रोखले ते पाहून छान वाटले.'

सलमानचे अपकमिंग प्रोजेक्ट्स

'टायगर 3' या चित्रपटात सलमान खानसह कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे युरोपियन देशात 45 दिवसांचे शूटिंग शेड्युल आहे. चित्रपटात इम्रानची नकारात्मक भूमिका असेल. इम्रानच्या एन्ट्री सीनला धमाकेदार बनवण्यासाठी निर्मात्यांनी 10 कोटींपेक्षा जास्त खर्च केल्याचे वृत्त आहे. 'टायगर 3' हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. याशिवाय सलमान जॅकलिन फर्नांडिससह 'किक 2', पूजा हेगडेसह 'कभी ईद कभी दिवाली' आणि आयुष शर्मासह 'अंतिम : द फायनल ट्रूथ' या चित्रपटातही झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...