आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा-वाजिदचा अखेरचा व्हिडीओ:हॉस्पिटलमध्येही संगीतापासून दूर राहिले नाही वाजिद, भाऊ साजिदसाठी गायले - 'मैं हूं दबंग'

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा वाजिद यांचा शेवटचा व्हिडीओ असल्याचा दावा केला जातोय.

संगीतकार वाजिद खान यांचे रविवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. वाजिद यांच्या निधनानंतर रुग्णालयातील त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून हा त्यांचा शेवटचा व्हिडीओ असल्याचा दावा केला जातोय. या व्हिडीओमध्ये ते आपला भाऊ साजिदसाठी 'दबंग 3'चे टायटल साँग गाताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये त्यांच्या हाताला सलाइन ड्रिप लागलेली दिसतेय. अखेरीस ते आपल्या भावाला लव्ह यू ब्रदर म्हणतात. वाजिद किडनीच्या आजाराशी लढत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रियासुद्धा झाली होती.  सोबतच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही वृत्त आहे. गायक मीकाला त्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यासाठी सांगितले होते. 

बातम्या आणखी आहेत...