आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतची मैत्रीण स्मिताचा दावा:माजी मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यूची बातमी ऐकताच सुशांतला येऊ लागले होते एंग्जायटी अटॅक, म्हणायचा - 'आता हे लोक मला सोडणार नाहीत'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिशा सॅलियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये काही कनेक्शन असल्याचे म्हटले जात होते.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या आठवडाभरापूर्वीच म्हणजे 8 जून रोजी त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलियन हिने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर, 14 जून रोजी सुशांतच्या आत्महत्येची बातमी समजताच लोकांनी या दोन्ही प्रकरणांमध्ये काही कनेक्शन असल्याचे म्हटले होते. तथापि, मुंबई पोलिसांनी या वृत्तांचे खंडन करत म्हटले आहे की, या दोन्ही प्रकरणात काही संबंध नव्हता. पण दिशाच्या आत्महत्येच्या बातमीने सुशांतवर गंभीर परिणाम झाला होता हे नाकारता येत नाही. त्याची जवळची फॅमिली फ्रेंड स्मिता पारीख यांनीही एका मुलाखतीत याची पुष्टी केली आहे.

  • सुशांतला एंग्जायटी अटॅक येऊ लागले होते

रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत स्मिता म्हणाल्या, दिशाच्या मृत्यूची बातमी ऐकून सुशांतला एंग्जायटी अटॅक यायला सुरुवात झाली होती. सुशांतची बहीण मीतूने मला सांगितले होते की, दिशाच्या मृत्यूमुळे सुशांतला मोठा धक्का बसला असून तो कोलमडला आहे. 'आता हे लोक मला सोडणार नाहीत', असे सुशांत म्हणायचा, असे स्मिता यांनी सांगितले.

  • बहिणीचा फोन उचलत नव्हता

स्मितानी पुढे सांगितले, '14 जून रोजी सुशांत आणि त्याची बहीण मीतू फॅमिली टाइम एन्जॉय करण्याच्या विचारात होते. 13 जूनच्या रात्री मीतूने सुशांतला फोन केला होता पण त्याने फोन उचलला नाही, मेसेज केला पण मेसेजला उत्तर दिले नाही. यानंतर, 14 जून रोजी सकाळी मीतूने सुशांतच्या अपार्टमेंटमध्ये राहणा-या सिद्धार्थ पिठानीला फोन करून सुशांत फोन किंवा मेसेज का देत नाही, अशी विचारणा केली. त्यावर तिला उत्तर मिळाले की, सुशांतने ज्युस मागितला आणि तो पिऊन तो बेडमध्ये झोपायला गेला आहे.'

यानंतर सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली. कारण सुशांत दार उघड नसल्याने मीतूला बोलावण्यात आले होते. चावीवाल्याकडून दुसरी चावी बनवून सुशांतच्या खोलीचे दार उघडण्यात आले होते. तिथे तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

बातम्या आणखी आहेत...