आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या सासूच्या भूमिकेत दिसणार कॉमेडियन गौरव दुबे:रूपमतीच्या भूमिकेतून नवीन सीझनमध्ये लावणार एंटरटेन्मेंटचा तडका

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करण्यासाठी परतला आहे. शोच्या या सीझनमध्ये अनेक नवीन विनोदी कलाकारांची एंट्री झालेली आहे. मात्र, या पाच कलाकारांमध्ये कप्पू शर्माच्या सासूची सर्वाधिक चर्चा होत आहे. सीझन 4 मध्ये कप्पू शर्माचे लग्न झाले होते, आता तो बिंदू म्हणजेच सुमोना चक्रवतीचा पती झाला आहे. या नव्या सीझनमध्ये कप्पूच्या पत्नीसोबत त्याची सासू, सासरे आणि मेहुणाही दिसणार आहेत, ज्यांची झलक शोच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाली आहे.

सासूच्या भूमिकेत दिसणार आहे गौरव दुबे

या शोमध्ये प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन गौरव दुबे कपिलच्या सासूची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी, गौरव झी कॉमेडी फॅक्टरी आणि कॉमेडी सर्कस सारख्या अनेक शोमध्ये झळकला आहे. यानंतर गौरव आता कॉमेडियन कपिल शर्माची सासू रूपमतीच्या भूमिकेत दिसणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना गौरव म्हणाला- 'या शोचा भाग बनल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी या कार्यक्रमाचा खरोखर आनंद घेत आहे कारण मी महान कलाकारांचा सहवास अनुभवत आहे. मग ते कपिल सर असो किंवा संपूर्ण क्रिएटिव्ह टीम. मला या शोमध्ये येण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. मला वाटतं मी इथे खूप काही शिकेन. मी कपिल सरांची सासू रूपमतीची भूमिका साकारत आहे.'

कपिलच्या शोमध्ये मी काम करावे असे आईचे स्वप्न होते
अभिनेता पुढे म्हणाला- 'कपिल शर्मासोबत मी करावे असे माझ्या माझ्या आईचे स्वप्न होते. कपिल सर खूप छान आहेत. ते मला गुरूप्रमाणे शिकवतात आणि माझ्यासह सर्व कलाकारांशी खूप प्रेमाने वागतात. अर्चना मॅडम खूप गोड आहेत, कपिल सर, किकू सर आणि सुमोना मॅडम यांच्यासोबत स्टेज शेअर करताना मी खूप आनंदी आहे.'

शोमध्ये यंदा नवीन थीम
'द कपिल शर्मा शो'च्या नवीन सीझनमध्ये नवीन पात्रांव्यतिरिक्त नवीन थीमचा समावेश आहे. शोमध्ये कपिल शर्माची स्मरणशक्ती कमी झाली आहे आणि तो पत्नी बिंदूला ओळखूही शकत नाही. अशा परिस्थितीत सासू, सासरे आणि मेहुणा गोली त्याच्या घरी आले आहेत. 'द कपिल शर्मा शो' सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो. शोचा नवीन सीझन 10 सप्टेंबरपासून ऑन एअर झाला असून दर शनिवार आणि रविवारी कपिल आणि त्याची टीम प्रेक्षकांना हसवायला छोट्या पडद्यावर दाखल होते.

बातम्या आणखी आहेत...