आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडे स्पेशल:कॉमेडियन कपिल शर्माला मित्राच्या निधनाची बातमी समजल्यानंतरही सुरु ठेवावे लागले होते चित्रीकरण, वाचा हा किस्सा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुःखी होऊनही लोकांना हसवायला हवे

विनोदवीर कपिल शर्मा हे आज इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. आज म्हणजेच 2 एप्रिल रोजी त्याने वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत. याच निमित्ताने कपिलच्या आयुष्यातील एक मोठा किस्सा तुम्हाला सांगतोय, जो स्वतः कपिलने एका मुलाखतीत शेअर केला होता. एका मित्राच्या निधनाची बातमी समजल्यानंतरही कपिलला त्याच्या शोचे चित्रीकरण सुरु ठेवावे लागले होते.

दुःखी असूनही लोकांना हसवायचे आहे
2020 मध्ये एका मुलाखतीत कपिलला प्रश्न विचारण्यात आला होता की, असे कधी घडले का, जेव्हा तू स्वतः दुःखी आहेस पण तरीही तुला लोकांना हसवायचे आहे,? यावर कपिल म्हणाला होता, "असे कधी कधी होते. ते तुमच्यावर अवलंबून असते, परंतु काहीवेळा तुम्ही काही गोष्टी तुमच्या डोक्यातून काढू शकत नाहीत. मी कॉमेडी नाईट्सचे शूटिंग करत होतो, रात्रीचे शूट होते आणि एका मित्राने फोन करुन सांगितले की, माझ्या एक मित्राचे पंजाबमध्ये निधन झाले. तो 35 - 36 वर्षांचा असेल. अचानक मला वाटले की मी आता काहीही करु शकणार नाही. मी या बातमीने खूप दुःखी झालो होतो. पण शो मस्ट गो ऑन..."

मित्राच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतरही शोचे शूटिंग सुरु ठेवले
कपिल पुढे म्हणाला, "मी 5 मिनिटांचा ब्रेक घेऊन स्टेजच्या मागे गेलो, त्यावेळी मला फोन केल्यामुळे मी माझ्या मित्राला शिवीगाळही केली. काही वेळा तुम्ही अस्वस्थ होता, पण जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता तेव्हा दैवी शक्ती तुम्हाला शांत राहण्यास मदत करते. "

कपिल ठरला होता 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'चा विजेता
कपिल 2007 मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' मधील त्याच्या अभिनयाने प्रकाशझोतात आला होता. हा शो जिंकल्यानंतर त्याने स्वतःचा टीव्ही शो सुरू केला, ज्यामुळे त्याला देशभरात ओळख मिळाली. त्याचे 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल', 'द कपिल शर्मा शो' आणि 'फॅमिली टाइम्स विथ कपिल' हे सर्व शो यशस्वी झाले आहेत.

वर्क फ्रंट
वर्क फ्रंटवर, कपिल नुकताच नेटफ्लिक्सचा शो 'आय एम नॉट डन यट'मध्ये दिसला होता. आता तो नंदिता दाससोबत त्याच्या पुढच्या प्रोजेक्टवर काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...