आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या आयुष्यावर आता चित्रपट:विनोदवीर कपिल शर्मावर येणार बायोपिक, चित्रपटाचे नाव असेल 'फनकार'

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘फनकार’ या बायोपिकचे दिग्दर्शन फुकरे फेम दिग्दर्शक मृगदीप सिंह लांबा करणार आहेत.

प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माचे जीवन आता त्याच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर बघता येणार आहे. आता यशोशिखरावर असलेल्या कपिल शर्माने आयुष्यात अनेक चढ- उतार पाहिले आहेत. आता त्याचा हा संघर्षापासून यशापर्यंतचा प्रवास मोठ्या पडद्यावर दाखवला जाणार आहे. कपिल शर्माचा बायोपिकची आज घोषणा झाली असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माता महावीर जैन यांनी या चित्रपटाची घोषणा केली. कपिल शर्माच्या जीवनावर तयार होत असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘फनकार’ असे असणार आहे.

‘फनकार’ या बायोपिकचे दिग्दर्शन फुकरे फेम दिग्दर्शक मृगदीप सिंह लांबा करणार आहेत. मात्र या बायोपिकमध्ये कपिलची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

कपिल शर्माच्या कामाबद्दल बोलायचे तर लवकरच त्याचा ‘कपिल शर्माः आय अॅम नॉट डन येट’ हा शो नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...