आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकअपचा विजेता घोषीत:कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला ‘लॉकअप’चा विजेता, ट्रॉफी, 20 लाख, आणि बरंच काही

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमेडियन मुनव्वर फारुकी ‘लॉकअप’चा ठरला आहे. मुनव्वरचा स्टँड-अप कॉमेडियन होण्यापासून लॉक अपचा विजेता बनण्यापर्यंतचा प्रवास बराच संघर्षमय आहे. ट्रॉफी व्यतिरिक्त, मुनव्वरला 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, एर्टिगा गाडी आणि इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली आहे. या शोचा फिनाले शनिवारी 7 मे होता. काही रिपोर्ट्समध्ये आधीच दावा करण्यात आला होता की मुनव्वर या शोचा विजेता होणार आहे. आपल्या कामातून लोकांच्या चेहऱ्यावर फक्त हास्य यावे, अशी मुनव्वरची इच्छा आहे.

70 दिवस मुनव्वर हा लॉकअप कार्यक्रमामध्ये होता. लॉक अप शो जिंकल्यानंतर मुन्नवरने प्रतिक्रिया दिली आहे. शो जिंकल्यानंतर मुनव्वर म्हणाला, "हे माझे ठिपके असतील.. मी त्या सर्व लोकांचा आभारी आहे. ज्यांनी मला पूर्वी चुकीचे समजले आणि आज मला इतके प्रेम दिले. मला फक्त कामातून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे आहे.

प्रिन्स शोमध्ये कैदी नव्हता -

शोमधील सर्वात दमदार स्पर्धकांपैकी एक असलेल्या मुनव्वरने पायल रोहतगी आणि प्रिन्स नरुला यांना मागे टाकून सर्वाधिक मते मिळविली. तर ग्रँड फिनालेमध्ये कंगनाने प्रिन्ससंदर्भात मोठा खुलासा केला. ती म्हणाली, की या शोमध्ये कैदी म्हणून जगणारा प्रिन्स नरुला हा प्रत्यक्षात कैदी नव्हता. त्याला शोमधील इतर कैद्यांचे रहस्य बाहेर काढण्यासाठी आणि बाकीच्यांना त्रास देण्याचा प्रोजक्ट देण्यात आला होता.

कंगनाने तिच्या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला -

शोच्या ग्रँड फिनालेमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी 'हम्मा हुम्मा' गाण्यावर डान्स केला. याशिवाय कंगनाने तिच्या चित्रपटातील गाण्यावरही जबरदस्त डान्स केला. शोच्या टॉप-5 फायनलिस्टबद्दल सांगायचे तर त्यात प्रिन्स नरुला, शिवम शर्मा, अंजली अरोरा आणि आझम यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...