आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु: खद:विनोदवीर राजीव निगमच्या वाढदिवशीच त्याच्या 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, व्यथित होऊन म्हणाला - वाढदिवसाचे काय सरप्राइज गिफ्ट मिळाले आहे?

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलगा दोन वर्षांपासून आजारी होता

लोकप्रिय विनोदवीर राजीव निगमचा 8 नोव्हेंबरला वाढदिवस होता, परंतु याच दिवशी राजीवचा मुलगा देवराजचा मृत्यू झाला. राजीवने स्वत:ला फेसबुकवर माहिती देताना एक वेदनादायक पोस्ट लिहिली आहे.

राजीवने आपल्या 9 वर्षाच्या मुलासोबतचा एक फोटो पोस्ट करत लिहिले की, 'वाढदिवसाचे हे काय सरप्राइज गिफ्ट आहे. माझा मुलगा देवराज आज मला सोडून निघून गेला. वाढदिवसाचा केक न कापता?',अशा शब्दांत राजीवने आपले दुःख व्यक्त केले आहे.

मुलगा दोन वर्षांपासून आजारी होता

मे 2018 पासून राजीवच्या मुलाची तब्येत ढासळण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावर फारशी माहिती न देता राजीवने फक्त आपला मुलगा व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले होते. मीडिया रिपोर्टनुसार, दोन वर्षांपूर्वी देवराज मित्रांसोबत खेळून घरी परतल्यानंतर आजारी पडला. त्यानंतर तो कोमात गेला. मुलाची तब्येत ढासळल्याने राजीवच्या अडचणी वाढल्या होत्या. अनेक अडचणींच्या दरम्यान त्याने आपल्या 'हर शाख पर उल्लू बैठा है' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते.

या चित्रपटाच्या शुटिंगनंतर राजीवने करिअरकडे दुर्लक्ष करत कुटुंबावर लक्ष केंद्रित केले होते. तो आपल्या मुलासह त्याच्या गावी कानपूर येथे राहू लागला. ऑगस्ट 2020 मध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यावर राजीवला आणखी एक धक्का बसला होता.

स्टँड अप कॉमेडीमध्ये बनली ओळख

राजीव 2011 मध्ये पत्नी अनुराधा निगमसोबत मां एक्सचेंज या शोमध्ये दिसला होता. राजीवने आपल्या करिअरची सुरुवात स्टँड अप कॉमेडियन म्हणून केली होती. तो 'लाफ्टर चॅलेंज 2' चा रनर अप ठरला. या व्यतिरिक्त तो 'कॉमेडी सर्कस ज्युबिली शो'चा विजेताही होता. 'शेखर सुमन मूव्हर्स अँड शेकर्स' आणि 'कॅरी ऑन शेखर' हे कॉमेडी शो यशस्वी करण्यात राजीवचा मोठा वाटा होता.

बातम्या आणखी आहेत...