आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू श्रीवास्तव यांचे निधन:अमिताभचा 'दीवार' बघून हीरो बनायला आले होते मुंबईत, स्ट्रगलच्या दिवसात चालवला होता ऑटो

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले आहे. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान राजू यांची प्रकृती स्थिर झाली, पण नंतर त्याची प्रकृती आणखीनच खालावत गेली. एक महिन्याहून अधिक काळ व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राजू श्रीवास्तव हे देशातील सर्वात लोकप्रिय आणि आवडते विनोदी कलाकार होते. कधी त्यांनी रिअ‍ॅलिटी शोमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देऊन लोकांना हसवले तर कधी चित्रपटांमधून त्यांनी लोकांचे मनोरंजन केले. राजू यांनी आपल्या कारकीर्दीत भरपूर यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवली असली तरी सुरुवातीच्या काळात त्यांना बराच संघर्ष करावा लागला होता. कानपूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या राजू यांच्या यशापर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकूया-

बालपणापासूनच विनोद करायचे राजू

राजू श्रीवास्तव यांचा जन्म कानपूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सत्य प्रकाश हे त्यांचे खरे नाव आहे, पण पुढे जाऊन ते राजू श्रीवास्तव झाले. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे सरकारी कर्मचारी होते आणि छंद म्हणून कविता लिहायचे. सुट्ट्यांमध्ये त्यांचे वडील कविसंमेलनात सहभागी होत असत. त्यांना बलाई काका नावाने ओळखले जायचे.

लोकांचे मनोरंजन करण्याचे कौशल्यही राजू यांना वडिलांकडूनच मिळाले. लहानपणापासून राजू घरी आलेल्या पाहुण्यांसमोर मिमिक्री करायचे आणि शाळेतील शिक्षकांची नक्कल करून लोकांना खूप हसवायचे. अनेक शिक्षक यासाठी त्यांना शिक्षा करायचे, पण एक शिक्षक होते ज्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना कॉमेडीमध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला.

लोकांनी राजू यांना स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये कॉमेंट्री करण्याचा सल्ला दिला. यातून त्यांनी आपले कौशल्य लोकांसमोर आत्मविश्वासाने दाखवण्यास सुरुवात केली. त्यांना लहानपणापासूनच कॉमेडियन बनायचे होते, पण प्रत्यक्षात त्यांचे प्रेरणास्थान अमिताभ बच्चन होते. बिग बींचा 'दीवार' हा चित्रपट पाहिल्यानंतर राजू यांनी अभिनेता होण्याचा निर्णय घेतला होता.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत राजू श्रीवास्तव. अमिताभ यांच्या मिमिक्रीने राजू यांना छोट्या पडद्यावर ओळख मिळवून दिली होती.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत राजू श्रीवास्तव. अमिताभ यांच्या मिमिक्रीने राजू यांना छोट्या पडद्यावर ओळख मिळवून दिली होती.

कॉमेडियन बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबई गाठली
राजू यांना लहानपणापासूनच अभिनय आणि कॉमेडीमध्ये हात आजमावायचा होता, त्यासाठी त्यांनी 1982 मध्ये लखनऊ सोडले आणि स्वप्नांच्या शहर मुंबई गाठली. येथे त्यांच्याजवळ राहायला घर नव्हते, खायला पैसे नव्हते. घरून पाठवलेले पैसे कमी पडू लागल्यावर राजू ऑटोचालक झाले. राजू त्यांच्या रिक्षात स्वार असलेल्या लोकांना आपल्या विनोदाने हसवायचे. मुंबईत राजू यांना तब्बल 4-5 वर्षे संघर्ष करावा लागला होता.

रिक्षात स्वार असलेल्या एका व्यक्तीने मिळवून दिला होता पहिला ब्रेक
एके दिवशी त्यांच्या रिक्षात स्वार असलेल्या एका व्यक्तीने राजू यांच्या स्टाईलने प्रभावित होऊन त्यांना स्टेज परफॉर्मन्स देण्यास सांगितला. राजू यांनी होकार दिला आणि परफॉर्मन्स दिला, ज्यासाठी त्यांना फक्त 50 रुपये मिळाले होते. यानंतर राजू यांनी सातत्याने स्टेज शो करायला सुरुवात केली.

अमिताभ बच्चन यांच्या मिमिक्रीने मिळवून दिली ओळख
राजू श्रीवास्तव स्टेज शो करताना अमिताभ बच्चन यांची नक्कल करायचे. इथून लोकांनी त्यांच्या लूकची अमिताभ बच्चनशी तुलना करायला सुरुवात केली.

स्टेज शो करत असताना राजू यांची इंडस्ट्रीतील लोकांशी ओळख वाढली, त्यानंतर त्यांना चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका मिळू लागल्या. राजू पहिल्यांदा 1988 मध्ये आलेल्या 'तेजाब' चित्रपटात झळकले होते. पुढे त्यांनी जवळपास 19 चित्रपटांमध्ये काम केले.

कॉमेडी सर्कस शोमध्ये राजू श्रीवास्तव. या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू आणि शेखर सुमन हे जज होते.
कॉमेडी सर्कस शोमध्ये राजू श्रीवास्तव. या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू आणि शेखर सुमन हे जज होते.

कसा सुरु झाला कॉमेडियन बनण्याचा प्रवास

राजू श्रीवास्तव पहिल्यांदा 1994 च्या टी टाइम मनोरंजन शोमध्ये दिसले होते. त्यानंतर त्यांनी द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेतला. राजू या शोमध्ये तिस-या स्थानी राहिले. या शोमुळे त्यांना देशभरात ओळख मिळाली. यानंतर राजू कॉमेडी का महामुकाबला, कॉमेडी सर्कस, देख भाई देख, लाफ इंडिया लाफ, कॉमेडी नाईट विथ कपिल, द कपिल शर्मा शो आणि गँग्स ऑफ हसीपूर या शोमध्ये दिसले.

राजू श्रीवास्तव यांच्याशी संबंधित वाद

केआरकेला केली होती शिवीगाळ
राजू श्रीवास्तव 2009 मध्ये रिअॅलिटी शो 'बिग बॉस 3' मध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये राजू श्रीवास्तवची कमाल रशीद खानसोबतचा वाद चर्चेत राहिला होता. खरंतर केआरकेचं रोहित वर्मासोबत भांडण झालं तेव्हा त्याने रागाच्या भरात त्याच्यावर बाटली फेकली होती. ती बाटली शमिता शेट्टीला लागली होती, घरात दोन गट पडले होते. जेव्हा राजू श्रीवास्तवने केआरकेला खडे बोल सुनावले तेव्हा प्रकरण आणखी चिघळले होते.

बिग बॉस 2009 दरम्यान, कमाल आर. खान आणि राजू श्रीवास्तव. या शोमध्ये दोघांमध्ये बराच वाद झाला होता.

पाकिस्तानकडून आले होते धमकीचे फोन
2010 मध्ये राजू श्रीवास्तव यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन आले होते. या धमकीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विनोद न करण्याची ताकीद त्यांना देण्यात आली होती.

शिल्पा शेट्टीवर अश्लील कमेंट
बिग बॉस 11 मध्ये परफॉर्म करण्यासाठी पोहोचलेले राजू श्रीवास्तव अभिनेत्री शिल्पा शेट्टीवर अश्लील कमेंट करून वादात सापडला होते. ते म्हणाले होते, जर शिल्पा आई बनण्यासाठी आसुसली असेल तर तिला माहित असायला हवे होते की शक्ती कपूर तिच्या घराबाहेर उभा आहे.

समाजवादी पक्षाचे तिकीट मिळाल्याने एकवटली होती चर्चा
भाजपमध्ये येण्यापूर्वी 2014 मध्ये राजू श्रीवास्तव यांना समाजवादी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले होते, परंतु काही काळानंतर त्यांनी तिकीट परत केले. राजू म्हणाले होते की, त्यांना पक्षाच्या स्थानिक युनिटचा पाठिंबा मिळाला नाही. यानंतर राजू यांनी त्याच वर्षी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राजू श्रीवास्तव.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राजू श्रीवास्तव.

1 जुलै 1993 रोजी केले होते लग्न
राजू श्रीवास्तव यांनी 1993 रोजी शिखासोबत लग्न केले होते. या कपलला अंतरा ही मुलगी आणि आयुष्मान हा एक मुलगा आहे. त्यांना एक बहीण आणि 5 भाऊ आहेत.

पत्नी शिखासोबत राजू श्रीवास्तव
पत्नी शिखासोबत राजू श्रीवास्तव
बातम्या आणखी आहेत...