आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅक्ट्स@सुनील ग्रोव्हर:एकेकाळी मुंबईत फक्त 500 रुपये कमवत होता सुनील ग्रोव्हर, गुत्थीच्या पात्रातून मिळाली ओळख आणि आज आहे कोट्यवधीचा मालक!

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुनील ग्रोव्हर याच्याबद्दलच्या खास गोष्टी...

छोट्या पडद्यासोबत मोठ्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा कॉमेडियन सुनील ग्रोव्हरची नुकतीच हार्ट सर्जरी झाली असून आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुनीलला हार्ट ब्लॉकेज असल्याचे समजल्यावर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, सर्जरी करण्याआधी त्याने त्याच्या आगामी वेब सीरिजचे पुण्यात चित्रीकरण पूर्ण केले.

गुत्थी, रिंकू भाभी, डॉक्टर मशूहर गुलाटी या पात्रांनी सुनील ग्रोव्हरला लोकप्रियता मिळवून दिली. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' आणि 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमांमधून सुनील ग्रोव्हर प्रसिद्धीझोतात आला. आता कॉमेडी व्यतिरिक्त सुनील काही वेगळ्या भूमिकांमध्ये हात आजमावत आहे. सुनीलचा इथवरचा प्रवास इतका सोपा नव्हता. जेव्हा तो मुंबईत आला होता, तेव्हा त्याचा पहिला पगार केवळ 500 रुपये होता, पण आज तो स्वबळावर कोट्यवधींचा मालक झाला आहे.

अशाप्रकारे हरियाणातून मुंबईत पोहोचला सुनील
सुनीलचा जन्म 3 ऑगस्ट 1977 रोजी हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील डबवाली येथे झाला. येथेच त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या कुटुंबासह चंदीगढमध्ये शिफ्ट झाला आणि येथूनच आपल्या करिअरला सुरुवात केली. येथील गुरु नानक कॉलेजमधून त्याने बी. कॉमची आणि त्यानंतर पंजाब युनिव्हर्सिटीतून मास्टर्स इन थिएटरमध्ये ही पदवी प्राप्त केली. सुनीलचे वडील जेएन ग्रोव्हर हे स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर येथे मॅनेजर होते. ते आता निवृत्त झाले आाहेत.

शिक्षण पुर्ण झाल्यानंतर सुनील आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईत दाखल झाला. जसपाल भट्टी यांना आपला आदर्श मानणा-या सुनीलने सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत चंदीगढ थिएटरमध्ये काम केले. सुनीलने 'चला लल्लन हीरो बनने' या फिल्मी चॅनलवरील शोमध्ये मुव्ही जॉकी म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. टीव्हीवर येण्यापूर्वी सुनीलने दिल्लीतील रेडिओ मिर्ची या रेडिओ स्टेशनवर काम केले होते. येथे तो हंसी के फब्बारे हा शो होस्ट करत होता. यात त्याच्या पात्राचे नाव सुदर्शन होते.

2000मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण
सुनीलने बॉलिवूड सुपरस्टार्स आमिर खान आणि अजय देवगण यांच्यासह काम केले. 2000मध्ये आलेल्या 'प्यार तो होना ही था' या चित्रपटात त्याने अजय देवगणसह काम केले. हा त्याला पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. मात्र यात त्याला दोनच सीन मिळाले होते. त्यानंतर सुनील पुन्हा एकदा अजयसह 'द लीजेंड ऑफ भगतसिंह' (2002) मध्ये दिसला. यातही त्याच्या वाट्याला खूप कमी भूमिका आली. 2008मध्ये आलेल्या 'गजिनी' ब्लॉकब्लस्टरमध्ये सुनीलने आमिर खानसह काम केले होते. या चित्रपटात त्याने असिनच्या मित्राची भूमिका साकारली होती.

सुनीलच्या गाजलेल्या गुत्थी या पात्रामाधील एक रंजक कहाणी आहे. सुनीलला या पात्राची प्रेरणा त्याच्या कॉलेजच्या एका क्लासमेटकडून मिळाली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली आहे.

कपिलसोबत भांडण झाल्यावर सोडला होता शो
सुनील एकेकाळी 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' आणि 'द कपिल शर्मा'चा महत्त्वाचा भाग होता पण कपिलसोबतच्या भांडणामुळे हे नाते संपुष्टात आले. कपिल आणि सुनीलमध्ये मोठे भांडण झाल्यामुळे दोघांचे बोलणे बंद झाले आहे. हे भांडण 2017 मध्ये झाले होते, जेव्हा कपिलची टीम ऑस्ट्रेलियातील एका शोमधून परतत होती. त्यानंतर फ्लाइटमध्येच दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली होती. भारतात परतताच सुनीलने कपिलचा शो सोडला होता. सुनीलसोबत इतर काही सहकलाकारांनीही कपिलची साथ सोडली. त्यानंतर शो बंद झाला. तेव्हापासून कपिल आणि सुनील एकत्र काम करण्यास तयार झालेले नाहीत.

सलमानने समेट घडवून आणण्याचा केला होता प्रयत्न
बर्‍याच दिवसांनंतर जेव्हा कपिलने त्याच्या 'द कपिल शर्मा शो'च्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली तेव्हा शोचा निर्माता सलमान खानने सुनील आणि कपिलमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. सलमानच्या भारत चित्रपटाच्या व्यस्त शेड्यूलचे कारण देत सुनीलने कपिलच्या शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. काही दिवसांनी सुनीलने त्याचा नवीन शो 'कानपूर वाले खुराानाज' देखील आणला. सुनीलचा शो फक्त 8 आठवडे चालला. सुनीलचे व्यस्त वेळापत्रक आणि कमी टीआरपी हे शो बंद होण्याचे प्रमुख कारण होते.

कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक

गेल्या 5 वर्षात सुनीलची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच या पाच वर्षांत त्याची एकूण संपत्तीही वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनीलची एकूण संपत्ती 18 कोटींच्या आसपास आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर सारख्या आलिशान गाड्या आहेत. सुनीलला एका चित्रपटात काम करण्यासाठी 50 ते 60 लाख रुपये मिळतात, तर टीव्हीवर एका एपिसोडच्या शूटिंगसाठी तो 10 ते 15 लाख रुपये घेतो.

सुनीलने सांगितल्यानुसार, कुठेही परफॉर्म करण्यापूर्वी तो आपले सगळे जोक त्याची पत्नी आरतीला ऐकवतो. जर ती त्याच्या जोक्सवर हसली तर तो परफॉर्म करतो आणि जर तिला हसू आले नाही, तर ते जोक्स तो प्रेक्षकांसमोर सादर करत नाही. सुनीलची पत्नी आरती व्यवसायने इंटेरिअर डिझायनर आहे. या दोघांना एक मुलगा आहे.

बातम्या आणखी आहेत...