आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादात उडी:सोनू निगमच्या समर्थनार्थ पुढे आला कॉमेडियन सुनील पाल, टी-सीरिजच्या मालकाला फटकारले

मुंबई (अंकिता तिवारी)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनू स्वतःच एक इंडस्ट्री आहे, असे सुनील पाल म्हणाला.

गायक सोनूच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या कॉमेडियन सुनील पालने टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांना चांगलेच फटकारले आहे. सुनीलने भूषण यांना सोनू निगमला त्रास न देण्याचा सल्ला दिला आहे. सुनीलच्या म्हणण्यानुसार, सोनूला कुणाचीही गरज नाही. कारण त्याच्याकडे देवाने दिलेली सर्व काही आहे. गुलशन कुमार जर आज हयात असते तर त्यांनी मुलगा भूषणला त्याच्या कृत्याबद्दल चांगला चोप दिला असता, असे सुनील म्हणाला.  

सोनू निगमचा आरोप आहे की, भूषण कुमार यांनी संगीत इंडस्ट्रीतील 6 जणांना त्याच्या विरोधात मुलाखती देण्यास सांगितले आहे. सोनूच्या म्हणण्यानुसार, भूषण यांनी एका मीडिया हाऊसला एक प्रेस नोट पाठवून सोनूने केलेल्या म्युझिक इंडस्ट्रीतील मक्तेदारीचा दावा खोटा ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सोनूने म्युझिक इंडस्ट्रीत काही ठराविक लोकांची मक्तेदारी असल्याचे विधान केले होते. त्यानंतर त्याने थेट भूषण कुमार यांच्या नावाचा उल्लेख केला होता.

  • सोनू निगमला त्रास देणे सोडून द्याः सुनील पाल

सुनील म्हणाला, "भूषण कुमार द ग्रेट, टी-सीरीजचे मालक. लोक आपल्या पायाला स्पर्श करतात आणि पद्मभूषणला स्पर्श झाल्यासारखे त्यांना भासू लागले. भावा, सोनू निगमला त्रास देणे थांबवा. सोनू निगम गॉड ऑफ म्युझिक आहे, तो एक चांगला माणूस आहे. तन-मन-धन-फन, देवाने त्याला सर्व काही दिले आहे. तो एखाद्या कंपनीचा भुखेला नाही.  तो स्वतःच एक इंडस्ट्री आहे", अशा रोखठोक शब्दांत सुनील पालने आपले म्हणणे मांडले आहे. 

  • वडील हयात असते तर त्यांनी मुलाला दोन चापट मारल्या असत्या 

सुनील पाल इथवरचं थांबला नाही तर तो पुढे म्हणाला, "हे विसरू नका की गुलशन कुमारजी यांनी वेगवेगळ्या कंपन्यांची गाणी डब करुन,  कव्हर व्हर्जन बनवून ते टी-सीरिजच्या नावाने विकली. त्यावेळी तुमची माणुसकी कुठे गेली होती? आणि आज तुम्ही सोनू निगमविषयी उलटसुलट चर्चा करता. मोठ्या कलाकारांचे कधी आभार मानलेत का तुम्ही? सोनू निगमने गायलेले 'हँगओव्हर' हे गाणे नंतर सलमान खानकडून डब करुन घेतले. तुम्ही कुणाला विचारता का?', असा आरोप सुनीलने केला आहे. इतकेच नाही तर वडील आज जिवंत असते तर त्यांनी तुमच्या कानाखाली दोन चापट मारल्या असत्या, असेही सुनील पाल म्हणाला. 

  • 'नेपोटिज्म, ग्रुपिझम का करता?

 "भूषण कुमार, जागे व्हा. लक्षात ठेवा, प्रत्येक वाईटाचा अंत असतो. तुमच्या वडिलांनी टी-सीरिज कंपनी उभी केली. त्याचा सन्मान करा. कुणाकडून गाणी गाऊन घेता?  रीमिक्स बनवता. थोडी तरी लाज बाळगा. बाप होण्याचा प्रयत्न करू नका", असे सुनील पालने म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...