आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोदवीराला झाला कोरोना:वीर दासचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह, सोशल मीडियावर स्वतः दिली माहिती

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटांमध्येही झळकला आहे वीर

कॉमेडियन वीर दासलै कोरोनाची लागण झाली आहे. नुकताच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोविड-19 रॅपिड टेस्टिंग किटचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत वीरने सांगितले की, आता तो RTPCR चाचणी करणार आहे. यासोबतच त्याने परफॉर्म करु शकत नसल्याने गुजरातच्या जनतेची माफीही मागितली आहे.

चाहत्यांना तिकिटाचे पैसे परत देणार

वीर दासने सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, "गुजरात. सकाळी उठल्यावर मला माझ्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसली, त्यामुळे आता मी RTPCR चाचणी करणार आहे. टीम सध्या गुजरात शोसाठी नवीन तारखांवर काम करत आहे. जेव्हाही व्हेन्यू उपलब्ध असतील, तेव्हा तुमचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर गुजरातमध्ये येण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हवे असल्यास आम्ही तुमच्या तिकिटाचे पैसे परत देऊ शकतो. माफ करा गुजरात! मला खूप वाईट वाटत आहे, पण मला आशा आहे की तुम्ही नक्की पुन्हा शो बघण्यासाठी याल. मला आशा आहे की तुम्ही नवीन तारखांना परत याल," असे वीरने म्हटले आहे.

चित्रपटांमध्येही झळकला आहे वीर
वीर दासचा जन्म 31 मे 1979 रोजी डेहराडून, उत्तराखंड येथे झाला. वीर हा प्रसिद्ध कॉमेडियन आहे आणि सोशल मीडियावर त्याची खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे. कॉमेडियन असण्यासोबतच वीर दास एक अभिनेता देखील आहे. 2007 मध्ये 'नमस्ते लंडन' या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वीरचे वादांशी जुने नाते असून अनेकदा तो वादात सापडला आहे.

बातम्या आणखी आहेत...